औरंगाबाद - गारखेडा परिसरात सकाळी साडेदहा वाजता दोघे मित्र सोबत दारू पिले. त्यानंतर ते गप्पा मारत उभे असताना आणखी दोन मित्र तेथे आले. त्यांनी एकाला पेट्रोल मागितले ते देण्यावरून किरकोळ बाद होताच दुचाकीतील पेट्रोल काढून एका मित्राच्या अंगावर टाकून त्याला चक्क पेटवून देण्यात आले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिनेश रुस्तमराव देशमुख (वय ३१, रा. मोतीनगर) हा गंभीर जखमी झाला होता. दिनेश खासगी वाहनावर चालक आहे. १९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो घरातून बाहेर पडला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र किरण गाडगिडे त्याला भेटायला गेला. घराजवळील रिकाम्या प्लॉटवर गप्पा मारत दोघांनी दारू पिली. दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे नितीन सोनवणे व भागवत गायकवाड आले.यावेळी नितीने कामावर जाण्यासाठी पेट्रोल दे, अशी मागणी केली. किरणने दिनेशला पेट्रोल देण्यासाठी सांगितले. त्याने थोडेच पेट्रोल देण्याची तयारी दर्शवली, पण आणखी जास्त पेट्रोलची मागणी नितीनने केली. तेव्हा दिनेशने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतच्या इशाऱ्यावरून नितीनने काढलेले पेट्रोल दिनेशच्या अंगावर फेकले. ज्याच्यासोबत दारू पिली त्या किरणने त्याच वेळी जवळच्या किराणा दुकानातून काडेपेटी आणली व पेटवून दिनेशच्या अंगावर फेकली. त्या वेळी एकदम भडका उडाला. दिनेश गंभीर भाजला गेला. हा प्रकार कळताच स्थानिक, कुटुंबीयांनी धाव घेतली दिनेशला खासगी रुग्णालयात दाखल केले.
चोवीस तासांत आरोपींना अटक -
दरम्यान या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे विशेष पथकाने भागवत सर्जेराव गायकवाड (वय 26 ), नितीन प्रभाकर सोनवने (वय 27), बालाजी तुकाराम गाडगीळ (वय -28) सर्व रा. न्यू मोतीनगर गारखेडा यांना अटक केली.सदरची कारवाई पुंडलिकनगर चे सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, राजेश यदमळ, विलास डोईफोडे, अजय कांबळे, मांटे, कल्याण निकम यांनी केली.