ETV Bharat / state

दोस्त दोस्त ना रहा ! औरंगाबादमध्ये उधारी मागितली म्हणून मित्राला जिवंत जाळले

दुचाकी घेण्यासाठी हात-उसने दिलेले 3 हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे.

दोस्त दोस्त ना रहा ! औरंगाबादमध्ये उधारी मागितली म्हणून मित्राला जिवंत जाळले
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:18 PM IST

औरंगाबाद - दुचाकी घेण्यासाठी हात-उसने दिलेले 3 हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश नामदेव दिवेकर (वय 32 रा. पंढरपूर. ता. जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दत्ता कराळे असे आरोपीचे नाव आहे. मृत उमेश आणि दत्ता या दोघांनी मिळून साडेतीन हजार रुपयात जुन्या वापरातील एक दुचाकी खरेदी केली होती. त्यासाठी उमेशने 3 हजार रुपये दिले होते. त्यानंतर ती दुचाकी दत्ता वापरत होता. दुचाकीला दिलेले पैसे अनेक दिवसानंतरही परत मिळत नसल्याने उमेशने दत्ताच्या घरी येऊन पैशाची मागणी केली.

घरी येऊन पैशाची मागणी केल्याने दत्ताचा राग अनावर झाला. त्याने घरात ठेवलेली पेट्रोलची बाटली उमेशच्या अंगावर ओतून काडी लावली. या घटनेत उमेश गंभीर जळाला. त्याच्यावर उपचार सुरु असताना रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

Intro:दुचाकी घेण्यासाठी हातउसने दिलेले तीन हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्य अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली.
उमेश नामदेव दिवेकर (वय-32 रा.पंढरपूर. ता.जि. औरंगाबाद) असे जाळल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दत्ता कराळे असे पेट्रोल टाकून जिवंत जळणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
Body:मृत उमेश आणि दत्ता या दोघांनी मिळून साडेतीन हजार रुपयात जुन्या वापरातील एक दुचाकी खरेदी केली होती. त्यासाठी उमेश ने तीन हजार रुपये दिले होते.ती दुचाकी दत्ता वापरत होता. दुचाकीला दिलेले पैशे अनेक दिवस झाल्यानंतरही परत मिळत नसल्याने उमेश दत्ताच्या घरी गेला व पैशाची मागणी केली. घरी येऊन पैशाची मागणी केल्याने दत्ता ला राग अनावर झाला त्याने घरात ठेवलेली पेट्रोलची बाटली उमेशच्या अंगावर ओतली आणि काडी लावली.या घटनेत उमेश गंभीर जळाला होता त्यावर उपचार सूरु असताना ( 9 जून) माधरात्री त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.