औरंगाबाद - माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच शिवसेना पक्षातून निलंबन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश झुगारून विरोधात मतदान केल्याने देवयानी आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देवयानी डोणगावकर यांनी शिवसेना पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी भाजपचा पाठींबा घेत महाविकास आघाडीच्या विरोधात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यामुळे जिल्हापरिषदेत शिवसेनाला उपाध्यक्ष पदावर पाणी सोडव लागले, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत गेली तीन वर्ष शिवसेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर या अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निसटतात विजय मिळवावा लागला. महाविकास आघाडीच्या मीनाताई शेळके या अध्यक्षा झाल्या. अडीच वर्ष अध्यक्षपद मिळूनही देवयानी डोणगावकर यांनी भाजपचा पाठींबा घेत अध्यक्ष पदाची निवडणुकीत लढवली. तीन तारखेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मीनाताई शेळके आणि देवयानी डोणगावकर यांना २९ - २९ अशी समसमान मत मिळाली. त्यामुळे गोंधळ झाल्याने शनिवारी पुन्हा निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी पुन्हा ३० - ३० अशी समसमान मत मिळाली होती. अश्या वेळी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी चिठ्ठी कडून अध्यक्ष निवडला. या प्रर्कीयेत महाविकास आघाडीला विजय मिळाला असला तरी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान न मिळाल्याने भाजपच्या लहानू गायकवाड हे उपाध्यक्ष झाले आणि शिवसेनेला जिल्हा परिषदेत पद मिळवताना आले नाही. देवयानी डोणगावकर यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या हातात असलेली सत्ता गेल्याने हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला. त्यामुळे देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी दिली. या कारवाई मुळे निच्छित पक्षादेश तोडणाऱ्याना धडा मिळेल अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.