औरंगाबाद - पैठण एमआयडीसीमधील मॅट्रिक्स प्रा. लि. कंपनीतील वेअर हाऊसला रविवारी (काल) रात्री लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग इतकी मोठी होती की, धुराचे लोळ खूप दूरपर्यंत पसरले होते. दरम्यान, ही आग विझविण्यासाठी चार अग्निशमन दलांचे बंब आणि दहा पाणी टँकरचा वापर करण्यात आला. जवळपास तीन ते चार तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात या यंत्रणेला यश आले आहे.
मॅट्रिक्स कंपनी या कंपनीत औषधी गोळ्याकरीता लागणाऱ्या व्हिटामिन-एचे मटेरियलचे उत्पादन होते. उत्पादित झालेले हे मटेरिअल साठविण्यासाठी कंपनीत वेअरहाऊस बांधण्यात आलेले आहे. कंपनी चालू असताना रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. आग लागताच कामगारांना बाहेर काढण्यात आल्याने जीवितहानी टळली.
हेही वाचा - Fadnavis criticize government :आता संघर्षा शिवाय पर्याय नाही - फडणवीस यांची ठाकरे सरकारवर कडाडून टीका