गंगापूर (औरंगाबाद) - शहरातून जाणाऱ्या कायगाव ते देवगाव व वैजापूर ते बिडकीन या महामार्गाचे काम सुरू आहे. दोन्ही महामार्ग गंगापूर शहरातून जाते आहे. अनेक ठिकाणी अर्धवट काम झाले आहे. सोमवारी (31मे) झालेल्या जोरदार पावसाने अपूर्ण काम असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, महाराणा प्रताप चौकात रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी साचले होते. हा शहरातील मुख्य रस्ता असल्याने मोठ्या मालवाहू वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जोरदार पावसाने दुकानात शिरले पाणी
संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसाने शहरातील राजीव गांधी चौकातील विविध दुकानांत पाणी शिरून एक ते दीड फुट पाणी साचल्याने दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी दुकान मालकाकडून होत आहे.
हेही वाचा - ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई