ETV Bharat / state

अवैध दारू वाहतूक प्रकरणी पोलीस जमादारसह चौघांवर कारवाई, साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : May 28, 2020, 12:45 PM IST

जिल्ह्यात संचारबंदी व दारूबंदी असताना नियमांचे उल्लंघन करून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या सहा जणांवर बदनापूर पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली. तर, आरोपींमध्ये औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत एका जमदाराचा समावेश असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी पोलीस जमादारसह चौघांवर कारवाई

औरंगाबाद - लॉकडाऊनमध्ये विनापरवाना चारचाकी वाहनातून विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या जालना शहरातील दोन वाइन शॉप चालकांसह 6 जणांविरुद्ध बदनापूर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 7 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तर, आरोपींमध्ये औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत एका जमादाराचा समावेश असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात दारू, देशी दारूबंदी कायम ठेवली आहे. तर, शेजारील जालना जिल्ह्यात वाइन शॉप व देशी दारू दुकांनाना परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे, विदेशी दारूसाठी अनेकजण जालना जिल्ह्यात प्रवेश करून वाहनातून दारू नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 27 मे रोजी जालना येथून टोयोटा कंपनीच्या वाहनातून (एमएच 20 ई जी 9212) विदेशी दारू औरंगाबादला जात असल्याची माहिती बदनापूर पोलीस निरीक्षक एमबी खेडकर यांना मिळाली. माहिती मिळताच 4 वाजता पोलीस निरीक्षक एम बी खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, चरणसिंग बमणावत आदींनी सापळा रचून बदनापूर पोलीस ठाण्यासमोर या चारचाकीला थांबविले. यावेळी, एक पोलीस कर्मचारी व अन्य तीनजण त्या कारमध्ये बसलेले होते.

बदनापूर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये महागड्या विदेशी दारूचे 8 बॉक्स व 1 फुटलेला बॉक्स मिळून आला. याबाबत विचारणा केली असता, ही दारू जालना शहरातील दीपक व रुपम वाइन शॉपमधून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर माल स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी औरंगाबाद क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जमादार श्याम रघुनाथ मोहळ, सतीश शिवाजी देखणे, जितेंद्र अशोक चेटलानी, अविनाश अशोक चेटलानी यांच्याविरुद्ध विनापरवाना विदेशी दारू बाळगणे व वाहतूक करणे. तर, दीपक वाइन शॉप व रुपम वाइन शॉप चलकाविरुद्ध जिल्हाधिकारी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून 7 लाख 22हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास शेख इब्राहिम हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.