ETV Bharat / state

औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात; पुढील दोन महिने चालणार प्रयोग - रडार

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात असलेल्या रडारवरून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये हा प्रयोग राबवण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी विमान पश्चिम दिशेला पाठवण्यात आले आहे.

औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे.
author img

By

Published : Aug 9, 2019, 4:22 PM IST

Updated : Aug 9, 2019, 5:35 PM IST

औरंगाबाद- राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असला तरी मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद मधून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले आहे.

औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात असलेल्या रडारवरून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये हा प्रयोग राबवण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी विमान पश्चिम दिशेला पाठवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून मराठवाडा दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते. या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर रविवारी डॉपलर रडार बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रडारची यंत्रणा कार्यान्वीत झाल्यानंतर शुक्रवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाले.

विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोलरूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली. हे विमान औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात गेले असून 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या ढगांवर मेघबीजारोपन करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला का? या प्रयोगाच्या माध्यमातून नेमका किती पाऊस पाडला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Intro:राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असला तरी मराठवाड्यात अद्याप पाऊस म्हणावा तसा बरसला नसल्याने औरंगाबाद मधुन कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले. Body:औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात असलेल्या रडारवरून मिळालेल्या माहिती वरून विमान मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये हा प्रयोग राबवण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी पश्चिम दिशेला पाठवण्यात आले आहे. Conclusion:गेल्या काही वर्षापासून मराठवाडा दुष्काळाचा सामना करतोय. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते. या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर रविवारी डॉपलर रडार बसविण्याचे काम सुरु करण्यात आले होते. रडारची यंत्रणा कार्यान्वीत झाल्यानंतर शुक्रवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाले.
विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोलरूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली. हे विमान औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात गेले असून 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या ढगांवर मेघबीजारोपन करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले. हा प्रयोग यशस्वी झाला का, या प्रयोगाच्या माध्यमातून नेमका किती पाऊस पाडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Last Updated : Aug 9, 2019, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.