ETV Bharat / state

औरंगाबादेत अतिक्रमणाला विरोध केल्याने अभियंत्याला चाकूने भोसकले - aurangabad latest crime news

ऋषिकेश भास्कर मोरे (वय २३, रा. बाळकृष्णनगर, गारखेडा परिसर) असे जखमीचे नाव आहे. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत ऋषिकेशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमी ऋषिकेश भास्कर मोरे
जखमी ऋषिकेश भास्कर मोरे
author img

By

Published : Feb 14, 2021, 8:55 AM IST

औरंगाबाद - अतिक्रमण करणाऱ्यांना विरोध केल्याने टोळक्याने अभियंता तरुणाला चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना विजयनगर येथे घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ऋषिकेश भास्कर मोरे (वय २३, रा. बाळकृष्णनगर, गारखेडा परिसर) असे जखमीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, जखमी ऋषिकेशचे वडील भास्कर सखाराम मोरे यांनी दीड महिन्यापूर्वी विजयनगर रस्त्यावरील सखूबाई म्हस्के यांची जागा खरेदी केली होती. मोरे यांनी जागेवर बांधकाम देखील सुरू केले होते.

जखमी ऋषिकेश भास्कर मोरे
जखमी ऋषिकेश भास्कर मोरे

विरोध होताच केला वार...

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास राहुल नरवडे हा टोळक्यासह वाहनातून पत्रे घेऊन आला. नरवडे याने आणलेली पत्रे बांधकामाच्या ठिकाणी लावून अतिक्रमण केले. दरम्यान ही बाब बांधकाम करणाऱ्याने फोन करून जागामालक भास्कर मोरे यांना सांगितली. यावेळी ऋषिकेश, महेश तेथे गेले. त्यांनी आमच्या भूखंडावरील पत्रे काढा म्हणत विरोध केला. आरोपीनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी एका आरोपीने ऋषिकेशवर चाकूहल्ला करून त्याला खाली पाडले. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत ऋषिकेशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - आयपीएल लिलाव : ४२ वर्षीय क्रिकेटपटूसाठी कोण लावणार बोली?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.