ETV Bharat / state

शंभर वर्षांत भारतापुढे ऊर्जा निर्मितीचं आव्हान, देशाला जास्त प्रयत्नांची गरज - शास्त्रज्ञ पी रामाराव - P Rama Rao On Energy Generation

Energy Generation Issue : देशाला पुढची शंभर वर्ष ऊर्जा निर्मितीचं आव्हान असून त्यासाठी देशानं जास्त प्रयत्न करायला हवे असं मत भारतीय क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ, संरक्षण संस्थेच्या प्रगत तंत्रज्ञानाचे (Scientist Prahlada Rama Rao) माजी कुलगुरू आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे माजी संचालक पद्मश्री प्रल्हादा रामाराव (P Rama Rao On Energy Generation) यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात व्यक्त केलं. त्यांनी ऊर्जा निर्मिती बाबत नवीन प्रकल्प सुरू केला आहे.

Energy Generation Issue
शास्त्रज्ञ पी रामाराव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 8:13 PM IST

देशातील ऊर्जा निर्मितीच्या आव्हानांवर चर्चा करताना शास्त्रज्ञ पी रामाराव

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Energy Generation Issue: प्रल्हादा रामाराव यांनी सुरुवातीला उष्णता निर्माण करणारं यंत्र तयार केलं. त्यावर अजून संशोधन केलं तर पुढील दोन वर्षांत त्या माध्यमातून वीज निर्मिती करणं शक्य होईल; (Challenge of Energy Generation before India) मात्र त्यासाठी सरकारनं मदत करण्याची नितांत गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पद्मश्री प्रल्हादा रामाराव यांना भारत सरकारनं २०१५ मध्ये पद्मश्री हा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळांपैकी सर्वांत मोठे, भारतीय अंतराळ कार्यक्रमातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जाते. अशा संस्थेची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या सोबत त्यांनी २७ वर्षे काम केलं आहे. त्यासोबत आणखी नवे संशोधन त्यांनी हाती घेतले आहेत.

हायड्रोडनवर चालणारे यंत्र केले तयार: पद्मश्री शास्त्रज्ञ प्रल्हादा रामाराव यांनी खासगी संस्थेच्या माध्यमातून नवा प्रकल्प सुरू केला आहे. त्यात संशोधन करून त्यांनी हायड्रोजनच्या माध्यमातून एक यंत्र तयार केलं आहे. या यंत्रामुळे थंड प्रदेशात उष्णता निर्माण करता येते. जास्त संख्येत घेतल्यास हे यंत्र अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल, असा दावा पी रामाराव यांनी केला आहे. एकदा यंत्र लावले की, किमान सहा महिने तरी ते काम करत राहील. त्यामुळे अतिरिक्त ऊर्जा वापरण्याची गरज राहणार नाही. ज्या ठिकाणी भारतीय जवान थंड प्रदेशात बंकरमध्ये काम करतात तिथे उष्णता निर्माण करण्याची गरज असते. त्याठिकाणी हे सर्वाधिक उपयुक्त राहील, असा विश्वास शास्त्रज्ञ पी रामाराव यांनी व्यक्त केला. तर सुरू असलेल्या या संशोधनाचे वेगवेगळे टप्पे असून यातूनच वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

चार देश करत आहेत संशोधन: ऊर्जा निर्मितीत चार देश प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. ज्यात जपान, चायना, अमेरिका आणि भारत यांचा समावेश आहे. जगात येणाऱ्या काळात सर्वांत मोठे आव्हान ऊर्जा निर्मितीत असणार आहे. त्यात भारताकडे संसाधन कमी असून जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. अमेरिका आणि जपान हे देश मोठ्या प्रमाणात संशोधन करत असून त्यासाठी पैसे देखील खर्च करत आहेत; मात्र त्यामानाने भारत म्हणावा तसा खर्च करायला तयार नाही. भविष्यकाळाची गरज बघून सर्वाधिक संशोधन करून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अमेरिका तर या संशोधनाच्या जोरावर अंतराळ मोहीम राबवण्याची तयारी करतोय. तर जपान सर्वसामान्यांसाठी याचा उपयोग करण्याचा मानस ठेवून आहे. आम्ही राबवित असलेल्या प्रकल्पाला जवळपास 18 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आज पाच संशोधक वैज्ञानिक मिळून यावर काम करत आहे. मात्र, अधिक पैसे मिळाले तर 15 ते 30 संशोधक यावर काम करतील आणि पुढील वर्षभरातच वीज निर्मितीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध केला जाऊ शकतो, असं मत शास्त्रज्ञ पी रामाराव यांनी व्यक्त केलं.

भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागेल: आज ऊर्जा निर्मितीसाठी जो आधी संशोधन पूर्ण करेल, तो पुढे असेल. त्यामुळे इतर तीन देशांच्या मानाने आपल्याला सर्वांत आधी संशोधन पूर्ण करून एक उत्तम पर्याय उभा करणे गरजेचं आहे. यात अमेरिका आणि जपान अधिक वेगाने प्रयत्नशील आहेत. जर आपण लवकर यात संशोधन पूर्ण करू शकलो नाही, तर येणाऱ्या काळात अमेरिका, जपान किंवा चायना या देशांकडून आपल्याला मदत घेण्याची वेळ येईल. आज आम्ही जे काही संशोधन करतोय किंवा जे यंत्र आम्ही तयार केले ते सर्वस्वी भारतीय बनावटीचे आहे. यात कुठलेही भाग बाहेरून घ्यावे लागले नाहीत. त्यामुळे आपल्याला योग्य दरात आणि योग्य पद्धतीनं ते मिळू शकतात. आम्ही सरकारकडे त्यासाठी 18 कोटी रुपयांची मदत मागितली होती; मात्र खासगी संस्था असल्यानं आम्हाला मदत मिळाली नाही. मग आम्ही आय.आय.टी. गुवाहाटी यांच्याशी संपर्क करून नवीन प्रोजेक्ट सादर केला. त्यावेळी आम्हाला एक कोटी तीस लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, ते लवकर आम्हाला मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञ पी रामाराव यांनी व्यक्त केला. काही खासगी लोकांकडून देखील थोडीफार प्रमाणात पैसे मिळत असून त्याआधारे आम्ही काम करत आहोत असं देखील त्यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. "आपण अंतिम सामना हारलो कारण तेथे 'पापी लोक' उपस्थित होते", ममता बॅनर्जींचं वादग्रस्त वक्तव्य
  2. कार्तिकी एकादशी सोहळा, चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची भाविकांची मागणी
  3. हुतात्मा गोवारी स्मृती दिवस; 29 वर्षांनंतरही गोवारी समाज लढतोय अस्तित्वाची लढाई, जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.