ETV Bharat / state

Eknath Shinde on MPSC : एमपीएससी परीक्षेबाबत व्हायरल झालेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण म्हणाले... - Eknath Shinde Sanjay Raut

एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी एमपीएससीच्या ऐवजी निवडणूक आयोग म्हणाल्याने टीका केली जात आहे. याच्य प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. गेली काही दिवस निवडून आयोगबाबत सारख्या चर्चा असल्याने परीक्षेबाबत असे म्हणले गेले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर सावरासावर केली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Feb 23, 2023, 7:09 AM IST

औरंगाबाद: खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आपल्याला मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतला दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची टिका: धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेत असल्याने ते घाबरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. आम्ही कामाने उत्तर देऊ, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले: वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साेमवारी २० राेजी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदाेलन केले. जाेपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही, ताेपर्यंत आमरण उपाेषणाला सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.

एमपीएससीकरिता निवडणूक आयोगाला पत्र : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, प्रसारमाध्यमांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोनलाबाबत विचारले असता, २०२५ पासून ही पद्धत लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका योग्य असून सरकार त्यासोबत सहमत आहे. तशीच परीक्षा व्हावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर सर्व क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे.

शरद पवारांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढणार असल्याची ग्वाही दिली. तसेच, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. जी. पाटील यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून आपण मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी. विद्यार्थ्यांना होणारी अडचण दूर करून मार्ग काढावा, असे पत्र शरद पवार यांनी कुलकुरूना दिल्याची विद्यार्थ्यांनी माहिती दिली. शरद पवार यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.

हेही वाचा: Strange Claim by CM Eknath Shinde निवडणूक आयोगाला पत्र लिहून एमपीएससीच्या प्रश्न सोडवतो मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.