छत्रपती संभाजी नगर (गंगापूर) Dussehra 2023 : विजयादशमीच्या मुहूर्तावर (Vijayadashami) सराफा दुकानाकडे सोने चांदी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांची सराफ दुकानामध्ये गर्दी होत असते. परंतु यावर्षी जिल्हात सरासरीपेक्षाही ५० टक्के कमी पाऊस झाला असल्यानं, याचा परिणाम सराफ बाजारावर दिसून येत आहे. तसेच पंधरा दिवसा अगोदर ५७ हजार रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याचा भाव ६२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचला आहे. दरवर्षी होणाऱ्या बाजाराप्रमाणे यावर्षी ५० टक्केपेक्षाही कमी बाजार झाल्याचं मत सराफ व्यापारी संतोष अंबिलवादे यांनी व्यक्त केलं आहे.
इस्रायल हमास युद्धाचा सोने चांदी भाव वाढीवर परिणाम : नवरात्र उत्सव (Navratri Utsav) सुरू आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या दसराचा मुहूर्त हा धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सोने खरेदीसाठी नागरिकांची सराफ दुकानात मोठी गर्दी असते. परंतु आज सोन्याचा दर ६२ हजार प्रति तोळा झाला आहे. तसेच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. इस्रायल व हमासमध्ये (Israel Hamas war) सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
कमी पावसामुळे शेती उत्पादनात घट : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह गंगापूर तालुक्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्यानं शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांनी कमी खरेदी केल्यानं सराफ दुकानात गर्दी नसल्याचं चित्र दिसत आहे. सोन्याच्या दरात भाव वाढ झाल्यानं अनेकांनी सोने खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. तर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी राजाने सोने चांदी खरेदीसाठी सराफ दुकानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.
हेही वाचा -