औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाले. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. परंतु, काही वेळातच नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना ( flood water in Aurangabad ) बुधवारी घडली.
कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे स्वतंत्र ( cremation pyre was surrounded by flood water ) स्मशानभूमी नाही. गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह जळाला.