गंगापूर(औरंगाबाद) - कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी लासुरगावला भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी आणि पथकाने येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या परिसराची पाहणी करत त्यास कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
लासुरगावात कंटेन्मेट झोन; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन घेतला आढावा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाम यांची भेट
लासुरगावमध्ये कोरोनाचे एकूण 22 रुग्ण सापडले असून 2 रुग्ण होम आयशोलन मध्ये आहेत. येथील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चव्हाण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची सक्तपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
लासुरगावात कंटेन्मेट झोन;
गंगापूर(औरंगाबाद) - कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी लासुरगावला भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी आणि पथकाने येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या परिसराची पाहणी करत त्यास कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
Last Updated : Mar 22, 2021, 7:44 AM IST