औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आज औरंगाबादेतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. फडणवीस हे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेसाठी औरंगाबादेत आले होते.
रावसाहेब दानवे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने रावसाहेब दानवे यांना प्रचार करणे शक्य नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी रुग्णालयात जाऊन दानवे यांची विचारपूस केली. सायंकाळी फडणवीस यांची गजानन महाराज मंदिर परिसरात जाहिर सभा झाल्यानंतर फडणवीस यांनी दानवेंची भेट घेतली. यावेळी दानवे लवकर बरे होतील आणि प्रचारात सक्रिय होतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.