औरंगाबाद- हाथरस प्रकरणात योगी सरकारने तात्काळ राजीनामा देण्याची मागणी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात करण्यात आली. महिला अत्याच्यांराच्या घटनांविरोधात आरपीआय तर्फे औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसच्या घटनेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हाथरसच्या पीडितेच्या घरी भेट देत असताना बलरामपूर येथेच झालेल्या घटनेतील पीडितेबाबत काँग्रेसने एक शब्दही काढला नाही. काँग्रेसने असा भेदभाव करू नये, असा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला. यासोबतच, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही आरपीआय तर्फे करण्यात आली आहे.