औरंगाबाद - शहरातील शिवशंकर कॉलनी व्हॅलेंटाईन डेच्या मध्यरात्री प्रेमवीराने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना समोर आली. पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपाचारादरम्याना त्याचा मृत्यू झाला. जवाहनरगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुणाच्या हातावर आकाश आणि अश्विनी ही नावे गोंदवलेली होती.
प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा अंदाज...
संबंधित तरुणाने जेव्हा जाळून घेतले तेव्हा तो मुलीचे नाव घेऊन ओरडत होता. यावरून या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून अधिक तपास सुरू आहे.