ETV Bharat / state

Suspicion Of Human Sacrifice : मांत्रिकाच्या खोलीत मृतदेह, नरबळीचा संशय ; स्वत:च्याच मुलीची हत्या? - Suspicion of human sacrifice

औरंगाबादमधील वाळूंज येथील एका घरात मृतदेह आढळून (daughter dead body in Mantrik room) आला. तसेच त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दगड आणि लिंबू आढळून (Suspicion of human sacrifice) आले. त्यामुळे ही घटना नरबळी असल्याचा संशय वर्तविला जात आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस तपास करत (Suspicion of human sacrifice In Aurangabad) आहेत.

Suspicion Of Human Sacrifice
मांत्रिकाच्या खोलीत मृतदेह
author img

By

Published : Dec 15, 2022, 9:47 AM IST

Updated : Dec 15, 2022, 2:08 PM IST

प्रतिक्रिया देताना सूर्यकांत शेळके घरमालक

औरंगाबाद : भानामती आणि जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाच्या खोलीत सापळा (bone skeleton) झालेला मृतदेह आढळून आला. शेंदूर लावलेले दगड आणि लिंबू आढळून (Suspicion of human sacrifice) आले. नरबळीचा प्रकार असल्याचा शक्यता असून स्वतःच्या बावीस वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून त्याने मुलीचा मृतदेह स्वतःच्याच किचन घरात पुरून ठेवल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे. भाडेकरू घर सोडून निघून गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली (daughter dead body in Mantrik room In Aurangabad) आहे.

वाळूज भागात घटना : वाळूज येथील समता कॉलणीत सूर्यकांत शेळके यांचे दुमजली घर आहे. दहा खोल्या असलेल्या घराच्या दोन खोल्यांमध्ये काकासाहेब नामदेव भुईगड हा मांत्रिक पत्नी आणि दोन मुलीसह राहत होता. महिन्यांपूर्वी गावाकडे जाऊन येतो म्हणून तो आपल्या कुटुंबीयासह निघून गेला. त्याच्याकडे एक महिन्याचे घर भाडे थकीत राहिले होते. तर भाडेकरू येत नाही, म्हणून घरमालकाने अनेक वेळा त्यांना संपर्क करत होते. त्यावेळी येणार आहे, भाडे देतो असे तो सांगत होता. मात्र 14 डिसेंबर रोजी त्यांनी फोन उचलला नसल्याने, घर मालकाने घराचे दारावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. तर स्वयंपाक घरात असलेल्या ओट्याखाली धक्कादायक प्रकार समोर (Suspicion of human sacrifice In Aurangabad) आला.

ओट्याखाली मृतदेह : या मांत्रिकाने काही महिन्यापूर्वी स्वतःच्या 22 वर्षीय मुलीची हत्या करून मृतदेह किचन रूममधील सिलेंडर ठेवण्याच्या जागेवर पुरला होता. हा मांत्रिक फरार असल्याने घरमालकाने दरवाजा तोडला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहाचा सापळा झालेल्या ठिकाणी मीठ टाकलेले होते. तर शेंदूर लावलेला दगड, लिंबू आढळून आले. सुमारे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र या मांत्रिकाने स्वतःच्या मुलीची हत्या का केली, हे अजून समजू शकले नाही? तर मांत्रिक आणि त्यांचा परिवार फरार आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस तपास करत (Suspicion of human sacrifice) आहेत.

Last Updated : Dec 15, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.