ETV Bharat / state

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  बाल गृहाच्या नावाखाली मुलांची विक्री करणाऱ्या संस्थेचा भांडाफोड; दामिनी पथकाची कारवाई - महिला बाल कल्याण समिती

बाल गृहाच्या नावाखाली मुलांची विक्री करणाऱ्या संस्थेचा भांडाफोड झाला. महिलेने दिलेले मुल पाच लाखांमध्ये व्यावसायिकाला विक्री करत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. त्यांनतर कारवाई करत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. मुलं झाल्यावर महिलेने हे बाळ सामाजिक संस्थेला का दिले? असा प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला बाल कल्याण समितीने या बाळाला भारतीय समाज सेवा केंद्र येथे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक तपास जवाहर नगर पोलीस करत आहेत. शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात हा प्रकार समोर आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
बाळाची विक्री अनधिकृत
author img

By

Published : Jun 21, 2023, 2:04 PM IST

Updated : Jun 21, 2023, 2:27 PM IST

बाळाची विक्री अनधिकृत- पोलीस अधिकारी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजी नगरच्या महिला तक्रार निवारण केंद्राला एका अनाथालयात बाळाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. महिला तक्रार निवारण आणि पोलिसांच्या पथकाने अनाथालय गाठले आणि संपूर्ण आश्रमाची पाहणी केली, एका खोलीत एक बाळ झोळीत झोपलेले होते. आश्रमाचा चालक दिलीपची पत्नी सविता बाळाजवळच बसलेली होती. पथकाने विचारपूस केली असता पैठण तालुक्यातील बाभरूळ येथील महिलेने भावासह 14 जून रोजी आम्हाला बाळ दत्तक दिल्याचा दावा केला. परंतु अडीच महिन्याचे बाळ त्या महिलेचे असल्याचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही. त्याचवेळी शहरात व्यावसायिकाने पत्नीसह हे बाळ दत्तक घेण्यासाठी त्या ठिकाणी आलो असल्याचे सांगितले. त्यासाठी आम्ही पाच लाख देत होतो अशी माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे, उपनिरीक्षक अनिता फसाटे, ज्योती गात, जवाहर नगर पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलीस ठाण्यात गुन्हा : मिळालेल्या मुलाचा जन्म 21 एप्रिल 2023 रोजी झाला आहे. मात्र महिलेच्या पतीचा मृत्यू प्रमाणपत्रावर त्याचे निधन 16 नोव्हेंबर 2021 मध्ये झाल्याचे नमूद आहे. शिवाय तिसरे अपत्य चार वर्षाचे असल्याचे सुनिताने पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे बाळ अनैतिक संबंधातून तर झाले नाही ना? यासह मिळालेली माहिती आणि समोर आलेले तथ्य या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाळाला विकणारी आई, बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र वाहुळ, अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत आणि त्याची पत्नी सविता याच्यावर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप राऊत आणि सविता या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर बाळाच्या आई आणि मामाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली.

बाळाची विक्री अनधिकृत : शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात प्रकार अनधिकृत आहे. कुठलेही बाळ दत्तक घेण्यासाठी नियमावली शासनाने जारी केलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने त्याची नोंदणी करावी लागते, त्यानंतर त्या संबंधित आई-वडिलांची चौकशी केल्यानंतर दत्तक प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र त्यासाठी पैशांची देवाणघेवाण केली जात नाही. त्यामुळे या सामाजिक संस्थेने केलेली कृती अनधिकृत आहे. त्यांच्याकडे लहान बाळ सांभाळण्याबाबत किंवा दत्तक देण्याबाबत कुठलीही परवानगी आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी केला तपास सुरू : या संपूर्ण घटनेनंतर महिला तक्रार निवारण केंद्राच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर बाळाची देखभाल केली. सायंकाळी बाल समितीच्या आदेशाने भारतीय समाज सेवा केंद्र यांच्या ताब्यात बाळाला देण्यात आले. परंतु बाळ विकत असल्याची माहिती व्यावसायिकाला कशी कळाली. या संस्थेत यापूर्वी असे प्रकार केले आहेत का? पैठणच्या महिलेला संस्थेबद्दल माहिती अशी मिळाली? या बाबत माहिती पोलीस तपासात बाहेर येईल, त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. कामोठ्यात 4 लाखात बाळाची विक्री करणाऱ्या एक डॉक्टर व तीन महिलांना अटक
  2. धक्कादायक; गर्भातील बाळाच्या विक्रीची सोशल मीडियावर ऑनलाईन जाहिरात, पोलिसांनी उधळला डाव
  3. खळबळजनक ! खेळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री, माय-लेकावर गुन्हा

Last Updated : Jun 21, 2023, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.