ETV Bharat / state

वीरगाव येथील अतिक्रमण संदर्भात ग्रामसेविकेच्या चौकशीची मागणी; ग्रामविकास मंत्र्यांना पत्र - ग्रामसेविकेच्या चौकशीची मागणी

वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथील अतिक्रमण जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निष्क्रिय व बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विषयाचे ग्रामसेविकेवर कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांचकडून ग्रामविकास मंत्र्याना पत्र देण्यात आले आहे.

ग्रामसेविकेच्या चौकशीची मागणी
ग्रामसेविकेच्या चौकशीची मागणी
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:58 AM IST

वैजापूर(औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथील अतिक्रमणचा विषय हा जिल्ह्याचा चर्चेचा विषय बनला आहे. कारण, या ठिकाणी पक्के अवैध बांधकाम करून अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, प्रकरणी ग्रामपंचायतीकडून केवळ नोटीस देण्याखेरीज अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला ग्रामसेविकेचा पाठिंबा होता का? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रकरणात ग्रामसेविकेची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र गावकऱ्यांनी ग्रामविकास मत्री मुश्रीफ यांना दिले आहे.

वीरगाव येथे गेल्यावर्षी 22 नोव्हेंबर 2020 ला 5 अवधैरित्या गाळ्यांची निर्मिती सुरू झाली. मात्र, यासाठी कोणोचाही परवानगी घेण्यात आली नाही. या प्रकरणी काही दिवसातच वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर 29/12/2020 येथीस 6 अतिक्रमण धारकांना गावच्या ग्रामसेविका यांनी नोटीस बजवल्या. मात्र, नोटीस बजावूनही या अतिक्रमणधारकांवर कुठलाही परिणाम झाला नाही आणि कारवाईही झाली नाही. त्यामुळे या नोटीस केवळ सरकारी दस्तऐवज रेकॉड वर लावण्यासाठी होत्या का? तसेच अतिक्रमण ग्रामसेविकेच्या सहमतीने झाले का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

"राजकीय दबाब की,पैशांची देवाणघेवाण?

वैजापूर तालुक्यातील वीरगावला राजकीय खेळाडुचे होम पिच मानले जाते, मागील ग्रामपंचायत निवडणुकीत अवैध बांधकामाला समर्थन करून मतदारांना वचनबद्ध केले. सत्ता आल्याने आता त्यांना कशाचीच भीती उरली नाही, त्यामुळे अतिक्रमण धारकांची हिंमतीही वाढल्याचा प्रकार दिसून येत आहे. तसेच हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई होत नसल्याने राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहार झाला असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामविकास मंत्र्यांना पत्र
ग्रामविकास मंत्र्यांना पत्र
त्या ग्रामसेविकेची कामगिरी संशयास्पद?वीरगाव ची ग्रामसेविका वैशिला देवरे यांनी दि 29/12/202 रोजी अतिक्रमण धारकांना पहिली नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर दुसरी नोटीस बजावणे बंधनकारक असतानाही तो नियम त्यांनी पायदळी तुडवत अतिक्रमण धारकांना मोकळे रान ठेवले. त्यामुळे त्यांची कामगीरी गावकऱ्यांना संशयस्पद वाटु लागली आहे. यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.