औरंगाबाद - राज्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी, अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, अद्याप उद्दिष्टपूर्ती झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरण करवून घेत सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
औरंगाबाद शहरात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचा प्रतिसाद कमी प्रमाणात असल्याने, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी आज लस घेतली.
हेही वाचा - राज्यात 3451 नवीन कोरोनाबाधित; 30 रुग्णांचा मृत्यू
पहिल्या टप्प्यात मिळाला 50 टक्क्यांहून कमी प्रतिसाद
जानेवारी महिन्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलं गेलं. मात्र या मोहिमेला अल्प प्रतिसाद दिसून आला. अनेक कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण दिसून आले. लस घेतल्यावर अनेकांची प्रकृती बिघडली. या कारणामुळे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवली. औरंगाबाद शहराचा विचार केला तर 22 हजारहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली होती. मात्र, त्यापैकी अवघ्या नऊ ते साडेनऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. तर ग्रामीण भागातही अल्प प्रतिसाद दिसून आला. ग्रामीण भागात जवळपास पंधरा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लसीकरण
पहिल्या टप्प्यात लसीकरणाची टक्केवारी कमी दिसून आल्याने दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेला वेग यावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी लसीकरण याच्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग नोंदवला. जिल्हा रुग्णालयात सकाळी अकरा वाजता सर्वांनी एकाच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेत, लसीचे कुठलेही अपाय नाहीत त्यामुळे सर्वांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं.
हेही वाचा - रायगड : जिल्ह्यात मत्स्य पर्यटनाला मिळणार चालना, स्थानिकांना रोजगार संधी