ETV Bharat / state

धनंजय मुंडे अडचणीत; सरकारी जमीन हडपप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सरकारी जमीन बेलखंडी मठाला बक्षीस दिली होती. तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. खरेतर बक्षीस मिळालेल्या कुठल्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र, येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी याचिकेत म्हटले आहे.

author img

By

Published : Jun 11, 2019, 3:19 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे

औरंगाबाद - सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रकरणाबद्दल माहिती देताना वकील

सरकारी जमीन बेलखंडी मठाला बक्षीस दिली होती. तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. खरेतर बक्षीस मिळालेल्या कुठल्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र, येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी याचिकेत म्हटले आहे.

जमिनीवर पीक होत असताना त्या जमिनीला नापिक बनवण्यात आली आहे. याप्रकरणी फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधीत पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज त्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्या वकिलाशी संपर्क साधला असता, जमिनीच्या सातबाऱ्यावर कुठेही ही जमीन बक्षीस असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.

Intro:अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या संकटात वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत .सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. Body:सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती, तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली.. खरतर कुठलीही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही मात्र येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्त्यांना म्हटल आहे. Conclusion:कृषी जमीन असताना देखील अकृषिक करून घेतल्याचे देखील या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र तपासी अंमलदारांनी यात कुठलीही पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली .औरंगाबाद खंडपीठाने तपासी अंमलदारयावर देखील ताशेरे ओढले आहेत. आणि या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. याचिकाकर्त्याचे वकील या प्रकरणी आम्ही धनंजय मुंडे यांच्या वकिलाशी संपर्क साधला असता औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे मान्य केलं मात्र सदरील जमिनीच्या सातबार्‍यावर ककुठेहि ही जमीन इनामी असल्याचा उल्लेख नाही त्यामुळे याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय मुंडे यांचे वकिलांनी म्हटला आहे

Byte - ऍड. विजयकुमार सपकाळ - याचिककर्ता वकील

Byte - सिद्धेश्वर ठोंबरे - धनंजय मुंडे यांचे वकील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.