ETV Bharat / state

कोरोना लसीकरण प्रात्यक्षिक पडले पार, औरंगाबादेत 122 केंद्रांवर लसीकरण

author img

By

Published : Jan 8, 2021, 12:42 PM IST

कोरोना लसीकरण प्रात्यक्षिकाला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रात्यक्षिक केले गेले. शहरात सिडको एन 11, वाळूज बजाजनगर आणि वैजापूर या तीन ठिकाणी डेमो करण्यात आला. प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाल्यावर कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्या कशा सोडवाव्यात याबाबत चाचपणी आज करण्यात आली.

aurangabad corona vaccination
औरंगाबाद कोरोना लसीकरण

औरंगाबाद - कोरोना लसीकरण प्रात्यक्षिकाला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रात्यक्षिक केले गेले. शहरात सिडको एन 11, वाळूज बजाजनगर आणि वैजापूर या तीन ठिकाणी डेमो करण्यात आला. प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाल्यावर कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्या कशा सोडवाव्यात याबाबत चाचपणी आज करण्यात आली.

औरंगाबाद कोरोना लसीकरण

असे होणार लसीकरण....
लसीकरण करत असताना चार टप्प्यांमधून लाभार्थीना जावेलागणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य केंद्रात पोलीस कर्मचारी लाभार्थ्यांची नोंद आहे का? याबाबत पडताळणी करतील, दुसऱ्या टप्प्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल, तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण आणि ऑनलाईन नोंदणी केली जाईल, तर अंतिम टप्प्यात लस घेतल्यावर अर्धातास आराम कक्षात लसीकरणामुळे कोणती बाधा होत नाही ना, हे पाहिले जाईल. त्यानंतर प्रमाणपत्र देऊन 28 दिवसानंतर पुन्हा एकदा तपासणीसाठी तारीख दिली जाईल.

औरंगाबादेत 122 केंद्र लसीकरणासाठी सज्ज
प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यावर शहरातील 122 केंद्रांवर लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी आणि 6 ते 7 कर्मचारी असणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होईल त्यासाठी नोंदणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

हेही वाचा - जगभरातील देशांशी संबध सुधारण्याची किम-जोंग-उन यांची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.