ETV Bharat / state

...म्हणून कोरोनाबाधित रुग्ण दुचाकी चालवत पोहचला दुसऱ्या आरोग्य केंद्रावर - औरंगाबाद कोरोना न्यूज

कोरोना बाधित रुग्णाने ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र, आरोग्य केंद्राला कुलूप होते. त्यामुळे रुग्णाला दुचाकी चालवत चितेगाव येथील कोविड सेंटर गाठवे लागल्याचे समोर आले आहे.

आरोग्य केंद्राला कुलूप
आरोग्य केंद्राला कुलूप
author img

By

Published : Apr 2, 2021, 2:32 PM IST

Updated : Apr 2, 2021, 2:52 PM IST

पैठण (औरंगाबाद) - तालुक्यातील ढाकेफळ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोना बाधित रुग्णाला गावातील आरोग्य केंद्राला कूलप असल्यामुळे दुचाकीवरून दुसऱ्या गावातील आरोग्य केंद्र गाठावे लागल्याचे समोर आले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण दुचाकी चालवत पोहचला दुसऱ्या आरोग्य केंद्रावर

दुचाकीवरून गाठले दुसरे कोविड सेंटर ..

ढाकेफळ गावातील एक तरूण कोरोना कोरोनाबाधित आढळून आला. त्याने उपचारासाठी ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र, आरोग्य केंद्राला कुलूप होते. त्यामुळे कोविड बाधित रूग्णाची तारांबळ उडाली. आरोग्य सेवा न मिळाल्याने रुग्णाला दुचाकी चालवत चितेगाव येथील कोविड सेंटर गाठवे लागल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सोमवारी फैसला, गृहमंत्र्यांवर केले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप

आरोग्य कर्मचारी गैरहजर
ढाकेफळ येथील कोरोनाबाधित युवक आरोग्य केंद्रात गेला असता अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद अवस्थेत होते. त्यामुळे रूग्णाची हेळसांड झाली. कुठे जावे कळत नव्हते. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला मात्र, रूग्णवाहीका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे त्या बाधित रुग्णाला चक्क दुचाकीवर चितेगाव येथील कोविड सेंटर गाठावे लागले.

दोषींवर कारवाईची मागणी
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते. यावरून आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे गैरहजर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पा. शिसोदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पुण्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर

Last Updated : Apr 2, 2021, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.