Exam Paper News : पाचशे रुपयांमध्ये परीक्षा सोडवण्यास अधिक वेळ, महाविद्यालयाने आरोप फेटाळले - परीक्षा केंद्रावर कॉपी
वाल्मीकरराव दळवी कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार आढळुन आला होता. यावर महाविद्यालयाने या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. बाहेरुन आलेल्या विद्यार्थांनी महाविद्यालयाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप महाविद्यालयाने विद्यार्थावर लावला आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : वाल्मीकराव दळवी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार समोर आले होते. यावर आता महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका मांडली असून यामध्ये आमचा कोणताही दोष नाही. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला बदनाम केल्याचा कट महाविद्यालयाने केला आहे. विद्यार्थांचे हे कारस्थान असून आम्ही सर्व आरोप फेटाळत असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. आमच्या कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारचे कॉपी होत नसल्याची माहिती महाविद्यालयाने दिली आहे.
परीक्षेला पैसे देऊन मिळतो अधिक वेळ : शेंद्रा परिसरात पीपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी कॉलेजचे विद्यार्थी वाल्मीक दळवी महाविद्यालयात परीक्षा देत आहेत. या केंद्रावर 180 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, या केंद्रावर परीक्षेचा निर्धारित वेळ झाल्यानंतर, पाचशे रुपये घेऊन आणखीन वेळ वाढून देत असल्याचे समोर आले. या केंद्रावर मास्क कॉपी सर्रास सुरू होते. इकडे भरारी पथक देखील फिरकत नसल्याचे समोर आले होते. सकाळी दहा ते साडे अकरा तसेच दुपारी एक ते अडीच पर्यंत परीक्षा घेण्यात येते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा अवघड गेली आहे. त्यांच्यासाठी चार वाजता अधिकचा वेळ देण्यात येत होता. इतकेच नाही तर, उत्तर येत नसेल तर जागा कोरी सोडा अशी निर्देशही परीक्षा केंद्रावर देण्यात येत होते. पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी बाजूला असलेल्या झेरॉक्स दुकानदाराची मदत घेतली जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाविद्यालयाबाबत चर्चांना उधाण आले असताना, महाविद्यालयाने मात्र आरोप फेटाळले आहे.
पेपर पुन्हा लिहिण्यासाठी पैशांची मागणी : पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी या कॉलेजच्या विद्यार्थिनीला, वाल्मीकराव दळवी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पेपर पुन्हा देण्यासाठी पीपल्स कॉलेजच्या, एका क्लर्कने पैशांची मागणी केली असल्याचा दावा या विद्यार्थिनीने केला आहे. तर गैरप्रकार करणाऱ्या बाबत चौकशी केली जाणार आहे. या आधी काही महाविद्यालयात गैरप्रकार झाले, त्यांची केंद्रे रद्द करण्यात आली आहे. कॉलेजची सलग्नता काढण्याची कारवाई देखील करण्यात येईल. याप्रकरणी तातडीने कारवाई करू असे आश्वासन कुलगुरू प्रमोद येवले यांनी दिले आहे.