औरंगाबाद - जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसतर्फे करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेला कायदा तातडीजे रद्द करावा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिला.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र मोठा पाऊस झाला आहे. शेतात पाणी भरले आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. लवकरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची विनंती करणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या कायाद्यामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील. या कायद्याचा आम्ही विरोध करत असून कायदा रद्द होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काँग्रेसच्या पद्धतीने विरोध करत आंदोलन करणार, असा इशारा डॉ. काळे यांनी दिला.
हेही वाचा - ...अन्यथा दुकान परवाना होणार रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश