ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार, भाऊबीजेनंतर बहिण-भाचीला सोडण्यासाठी निघाला होता भाऊ - Crime News

दिवाळी व भाऊबीज निमित्त माहेरी आलेल्या बहिणीला सासरी नेऊन सोडण्यासाठी जात असताना लासुर - गंगापूर रोडवर हा अपघात घडला. या अपघातात खुशी नितीन खेडकर (वय वर्ष ७, राहणार बुट्टेवाडगाव) या मुलीचा जागावेरच मृत्यू झाला आहे.

chimukli-killed-in-an-unidentified-vehicle-collision
अज्ञात वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार
author img

By

Published : Nov 8, 2021, 10:59 AM IST

गंगापूर (औरंगाबाद) - लासुर-गंगापूर रोडवर सावंगी चौकाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सात वर्षीय चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील मुलीची आई आणि मामा गंभीर जखमी झाले आहेत. खुशी नितीन खेडकर असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

भाऊबीजेनंतर बहिण-भाचीला सासरी सोडताना अपघात

दिवाळी व भाऊबीज निमित्त माहेरी आलेल्या बहिणीला सासरी नेऊन सोडण्यासाठी जात असताना लासुर - गंगापूर रोडवर हा अपघात घडला. या अपघातात खुशी नितीन खेडकर (वय वर्ष ७, राहणार बुट्टेवाडगाव) या मुलीचा जागावेरच मृत्यू झाला आहे. मुलीचे मामा प्रशांत गलांडे, आणि आई स्वाती खेडकर गंभीर जखमी आहेत. दिवाळी व भाऊबीजेसाठी आलेल्या बहिण आणि भाचीला सोडण्यासाठी प्रशांत गलांडे रायपुर वरून बुट्टेवाडगाव येथे दुचाकीने (एमएच २० एफडब्ल्यू ४१५३) जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात चिमुकल्या खुशीचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या दिवाळीचे काय? राज्य सरकारची घोषणा हवेतच; अजूनही नुकसानभरपाई नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.