औरंगाबाद - जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भारतातही कोरोना विषाणूने थेैमान घातले आहे. या विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोना रोगाविषयी जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची वेषभूषा केली होती. 'भारत छोडो करोना' आणि 'आओ फिरसे दिया जलाये', अशा घोषणा त्यांनी दिल्या. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस, यांच्याही वेशभूषा करुन चिमुकल्यांनी हातात फलक घेऊन घरात बसून देशातील जनतेला संदेश दिला.
श्रीरंग संभाजी चिरखे, विश्वजीत विष्णूदास पाचंगे, भार्गवी राजेंद्र बिबे, कैवल्य संभाजी चिरखे, विशाखा विष्णूदास पाचंगे,विराज युवराज करकोटक आदी चिमुकल्यांनी सहभाग सोशल डिस्टन्सचे भान ठेवत सहभाग नोंदवला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर उज्वला कुटे यांनी संचलन केले.