औरंगाबाद - सनदी अधिकारी आणि न्यायाधीशांना राजकारणात येण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर किमान तीन ते पाच वर्ष राजकारणात येता येणार नाही, असा कायदा करा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.
हेही वाचा- LIVE Updates : प. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
पाच वर्षांपर्यंत राजकीय प्रवेश नकोच
पोलिसांमध्ये अनेक निष्ठावान अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मागील काही घटनांमध्ये काही अधिकारी राजकीय पक्षांसोबत हितसंबंध जोपासत सेवा निवृत्त होताच लोकसभा, राज्यसभेत किंवा विधानसभेत येतात. त्यामुळे सेवेत असताना राजकीय पक्ष त्यांचा वापर करतात त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळेच प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था योग्य रीतीने चालावी याकरीता सनदी अधिकारी आणि सेवा निवृत्त न्यायाधीश यांना निवृत्तीनंतर पुढील तीन ते पाच वर्षे राजकीय प्रवेश किंवा निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा करायला हवा, अशी मागणी जलील यांनी लोकसभेत केली.
हेही वाचा..सचिन तेंडुलकर कोरोनाग्रस्त, कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटिव्ह