औरंगाबाद - शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संस्थान गणपतीची पूजा करण्यात आली. या पूजनाने शहरात होळीची सुरुवात झाली. यावेळी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.
राजाबाजार भागातील संस्थान गणपती हे औरंगाबादचे ग्रामदैवत आहे, अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे या मंदिराचे विशेष महत्व आहे. दरवर्षी या गणपतीची पूजा करून होळीच्या सणाला सुरुवात होते. यावर्षी देखील दरसालाप्रमाणे खासदार खैरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर होलिका दहन करण्यात आले.
सायंकाळी सामूहिक पूजन करून होळी पेटवण्याची प्रथा औरंगाबादेत आहे. होळी पेटवत असताना शहरातील सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळी एकत्र येतात आनंदाने उत्साहाने रंगांची उधळण करून होळी पेटवली जाते. होलिका दहन प्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देशातला दहशतवाद संपावा अशी इच्छा व्यक्त केली.