औरंगाबाद - भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी औरंगाबादेत मोर्चा काढला. देशात एनआरसी विरोधात लोक मोहीम राबवत आहेत. त्या संबंधात सुरू असलेल्या आंदोलकांची भेट आझाद यांनी घेतली.
भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली. सरकार एनआरसी मागे घेणार नाही असं म्हणते. मात्र, तसे होणार नाही. कारण, नागरिक विरोध करत असतील तर त्यांना माघार घ्यावीच लागेल, असे मत भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - म्हाडाच्या सभापतींची सरकार विरोधात न्यायालयात धाव
देशात अनेक ठिकाणी एनआरसी कायद्याचा विरोध होतोय. जी काही आंदोलन होत आहेत ती संविधानाला धरून होत आहेत. आज जो काही बंद पळाला जातोय त्यामुळे सरकारपर्यंत आमची मागणी पोहचणार आहे. हा मुद्दा आमच्या हक्काचा आणि आमची होणाऱ्या वाटणीचा आहे. मला कुठेही जपायला बंदी नाही, त्यामुळे मी सर्वत्र जाणार आहे. जनतेपेक्षा सरकार मोठं नाही हे लोकतंत्र आहे. त्यामुळे लोकांची मागणी असेल तर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल. आमच्यासोबत कोण आहे हे माहीत नाही. मात्र, जे लोक सोबत आहे त्यांचे मी आभार मानेलं अस भीम आर्मी अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजप प्रदेशउपाध्यक्ष डॉ. कराड यांच्या घरावर तुफान दगडफेक