ETV Bharat / state

...तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करु - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jan 4, 2021, 4:01 PM IST

Updated : Jan 4, 2021, 4:53 PM IST

औरंगजेबाच्या नावाने औरंगाबाद शहराला ओळखले जावे हे आम्हाला न पटणारे आहे. कारण औरंगजेब हा बाहेरून आलेला व्यक्ती होता आणि त्याने याठिकाणी आक्रमण करून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनीही औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. परंतु ते प्रकरण न्यायालयात गेले आणि नंतर तो प्रस्ताव बारगळला.

रंगाबादमध्ये सत्ता आल्यास तर प्रथम ‘संभाजीनगर’ नामांतर करु

औरंगाबाद- शहराचा नामांतरावरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात एक मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात औरंगाबाद ध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास सर्वात प्रथम शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करू अशी घोषणा पाटील यांनी केली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे नामकरण हा राजकारणाचा विषय नसून आमचा दृष्टीने अस्मितेचा विषय असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

...तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करु - चंद्रकांत पाटील
शिवसेना काँग्रेसला एकमेकांची गरज- औरंगजेबाच्या नावाने औरंगाबाद शहराला ओळखले जावे हे आम्हाला न पटणारे आहे. कारण औरंगजेब हा बाहेरून आलेला व्यक्ती होता आणि त्याने याठिकाणी आक्रमण करून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनीही औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. परंतु ते प्रकरण न्यायालयात गेले आणि नंतर तो प्रस्ताव बारगळला. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश देशातून गेल्यानंतर त्यांच्याशी संबंधित पुतळे आपण हटवले. औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काॅंग्रेसमध्ये मतभेद असून सरकार चालविण्याकरिता शिवसेनेला काॅंग्रेसची गरज असून काॅंग्रेसला ही शिवसनेची गरज आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत सांमजस्याने ताेडगा काढणे अपेक्षित आहे. भाजपासाठी हा अस्मितेचा विषय

रामदास आठवले यांनी औरंगाबादच्या नामांतरास केलेल्या विराेधाबाबत पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आपली लाेकशाही प्रगल्भ असून प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. भाजपचे दृष्टीने हा राजकारणाचा विषय नसून अस्मितेचा विषय आहे. बाबरी मस्जीद पाडून त्याठिकाणी राम मंदिर उभारणे हा केवळ मंदिर उभारण्याचा विषय नव्हता तर ताे अस्मितेचा विषय हाेता. औरंगाबाद प्रमाणेच पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली असून यासंर्दभात ते म्हणाले, राज्यात अशाप्रकारे विविध विषय समाेर येतात त्याबाबत राज्यसरकारने चर्चा करुन पुढील ताेडगा काढणे महत्वाचे आहे.

संजय राऊतांचा विषय माझ्यासाठी संपला
सामाना वृत्तपत्रातील अग्रलेखावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाचे संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली हाेती. त्यावर संजय राऊत यांनी पुन्हा अग्रलेखातून पाटील यांचा समाचार घेतला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, रश्मी ठाकरे या सुसंस्कृत व्यक्ती असून सामनाचे संपादक आहे. वृत्तपत्रातील अग्रलेखाचे लिखाणाची राऊत यांची भाषा त्यांना पटते का?अशी विचारणा मी केली हाेती आणि जर ती पटत असेल तर तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य, अशी टिप्पणी केली हाेती. ठाकरे यांना पत्र पाठविल्यानंतर माझ्यादृष्टीने संजय राऊतांचा विषय संपला असल्याचेही पाटील म्हणाले.

Last Updated : Jan 4, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.