ETV Bharat / state

औरंगाबादेतून चंद्रकांत खैरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पाचव्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात - चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे यांनी आज पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, भागवत कराड यांच्यासह सेना-भाजपचे आमदार उपस्थित होते.

चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Mar 30, 2019, 10:54 PM IST

औरंगाबाद - चंद्रकांत खैरे यांनी आज पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. यानंतर खैरे यांच्या प्रचारार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरू झाली आणि संस्थान गणपतीपर्यंत काढण्यात आली.

चंद्रकांत खैरे

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत खैरे शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. युतीचा उमेदवार म्हणून अर्ज सादर करताना आदित्य ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, भागवत कराड यांच्यासह सेना-भाजपचे आमदार उपस्थित होते.

अर्ज भरल्यानंतर, पुन्हा मीच जिंकणार असून सेनेचा गड राखणार, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला. तसेच १२ ते २ वाजेपर्यंत मुहूर्त असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन त्यांनी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे या मिरवणुकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, २ एप्रिलला ठाकरे शहरात रोड शो करत युवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे.

Intro:औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीचा भरला. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थित त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. Body:दुपारी एकच्या सुमारास चंद्रकांत खैरे शिवसेना - भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. युतीचा उमेदवार म्ह्णून अर्ज सादर करताना आदित्य ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, भागवत कराड यांच्यासह सेने भाजपचे आमदार उपस्थित होते. Conclusion:उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली. क्रांतिचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला आली. संस्थान गणपती पर्यंत हि मिरवणूक काढून खैरे यांनी केला. अर्ज भरल्यावर त्यांनी औरंगाबाद लोकसभा पुन्हा जिंकणार असून सेनेचा गड राखणार असा विश्वास व्यक्त करत १२ ते २ च्या मध्ये मुहूर्त असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोतीच दर्शन घेऊन अर्ज दाखल केला असल्याचं खैरे यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे या मिरवणुकीत सहभागी झाले नसून २ एप्रिल रोजी आदित्य ठाकरे शहरात रोडशो करत युवकांशी साधणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

byte - चंद्रकांत खैरे - युतीचे उमेदवार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.