ETV Bharat / state

Candle March Protest : नामांतर विरोधात कँडेल मार्च; खासदार जलील यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आंदोलनात सहभागी झालेले...

औरंगाबादच्या नामांतराविरोधात नामांतर विरोधी कृती समितीतर्फे कॅंडल मार्च काढण्यात आला. या कॅंडल मार्चला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आंदोलनात सहभागी झालेले कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नसून ते नामांतर विरोधी लोक आहेत, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

Candle March Protest
नामांतर विरोधात कँडेल मार्च
author img

By

Published : Mar 9, 2023, 10:51 PM IST

नामांतर विरोधात कँडेल मार्च

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून नामांतर विरोधी कृती समितीतर्फे शहरात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून साखळी आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. हातामध्ये इलेक्ट्रॉनिक मेणबत्ती घेत नामांतराला नागरिकांनी विरोध केला.

हातात मेणबत्त्या घेऊन आंदोलन : केंद्र सरकारच्या वतीने शहराचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले. त्यानंतर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी त्याच्यावर आक्षेप घेत तुम्ही पूर्ण प्रक्रिया राबवली का? असा प्रश्न उपस्थित केला. इतकच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात देखील केली. आंदोलन दरम्यान सलग सहा दिवस वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन केंद्र सरकार कसे चुकीचे आहे, याबाबत खासदार जलील यांनी टीका केली. त्याचबरोबर आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आल्याचं त्यांनी सांगत गुरुवारी कॅन्डल मार्च शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला प्रतिसाद म्हणून गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात कॅण्डल मार्चमध्ये नामांतराला विरोध असणाऱ्या नागरिकांनी सहभाग नोंदवला.

हिंमत असेल तर मतदान घ्या : आंदोलन दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आमच्या शहराचे नाव बदलायचं तुम्हाला कोणी सांगितले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर खरेच शहराचे नाव बदलायचे असेल तर जनतेचा कौल घ्या आणि मग निर्णय घ्या. निवडणूक प्रक्रिया राबवून कोणाच्या बाजूने जास्त मत होतील ते लक्षात घ्या आणि त्यानंतरच आमच्यावर हा निर्णय लादा. निर्णय लादणारे तुम्ही कोण होता? असा संतप्त प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

महिलांचा मोठा सहभाग : एमआयएम आणि नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हळूहळू प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गुरुवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या मार्चला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे, तर काही दिव्यांग व्यक्तींनी देखील या मार्चमध्ये सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी झालेले कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नसून ते नामांतर विरोधी लोक आहेत, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : NCP Party Workers Resignation : नामांतर विरोधात राष्ट्रवादीच्या चाळीस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.