छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): केंद्र सरकारने राज्यातील दोन शहरांची नावे बदलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याचे केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत नामांतर विरोधी कृती समितीने आंदोलन पुकारले. गेल्या सात दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू असताना गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. हातात मेणबत्ती घेऊन औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहील अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या.
सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल: गुरुवारी सायंकाळी नामांतर विरोधात हजारो लोकांनी हातात मेणबत्ती घेऊन कॅण्डल मार्च काढला. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन पूर्वनियोजित असले तरी, पोलीसांची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलन झाल्यानंतर पोलीसांनी आंदोलनाचे आयोजक खासदार इम्तियाज जलील यांच्यासह रॅलीत सहभागी झालेल्या हजार ते दीड हजार अनोळखी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नामांतर विरोधी लढा होणार तीव्र: राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून शहराचे नाव बदलण्यात आले, असे करताना सर्वसामान्यांचे मत मात्र जाणून घेतले नसल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तर कॅन्डल मार्च नंतर शुक्रवारी नामांतराला विरोध असणाऱ्या नागरिकांनी आपली दुकान बंद ठेवण्याचा आवाहन नामांतर विरोधी कृती समितीतर्फे करण्यात आले. यानंतर आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत चळवळ तीव्र करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
बेमुदत साखळी उपोषण: छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या नामांतराला आठवडा उलटल्यानंतर अखेर एमआयएमने आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. सर्व सामान्यांना औरंगाबाद हे नाव हवे आहे, आम्ही जन्माला आल्यापासून इथेच राहतो. या नावाला इतिहास असून तो पुसला जाऊ नये, असे, मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यानी यांनी व्यक्त केले होते.
हेही वाचा : MIM Oppose Renaming नामांतरणाला MIM चा विरोध खासदार इम्तियाज जलील बसले साखळी उपोषणाला