ETV Bharat / state

लग्नासाठी बाहेरगावी गेल्यावर भरदिवसा चोरी; पाळत ठेऊन 'हात साफ' केल्याचा संशय - aurangaband crime news

टोंगवस्ती येथील शेख वजीर हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यावेळी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे.

burglary in aurangabad
नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे.
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:13 AM IST

औरंगाबाद - पुणे महामार्गावरील गोदावरी नदी लगत असणाऱ्या टोंगवस्ती येथील शेख वजीर हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यावेळी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे. कपाटात ठेवलेली रोख 72 हजार रुपये व दागिने, असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

burglary in aurangabad
नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला

शेख वजीर हे दोन फेब्रुवारीला सकाळी पैठणला लग्नासाठी गेले होते. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने बँकेतून पैसे काढून आणले होते. याची संधी साधून सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान चोरट्यांनी एकूण एक लाख अकरा हजारांचा ऐवज लंपास केला. बाराच्या दरम्यान घराचे दार उघडे असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ वजीर यांना माहिती दिली.

गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन चौधरी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे संदीप डमाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी करत आहेत.

Intro:लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने भरदिवसा चोरी,कायगाव येथील घटना,सलग दुस-यांना चोरी नागरीक भयभीत.

औरंगाबाद -पुणे महामार्गावरील गोदावरी नदी लगत टोंगवस्तीवर शेख वजीर हे कुटुंबासह बाहेरगावी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मागच्या बाजूनी घरात प्रवेश करून घराची कडी कोंडा तोडुन घरातील कपाटात ठेवलेले रोख ७२००० रुपये व १६ भाराची चांदी सोने असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
शेख वजिर राहणार कायगाव हे २ फेब्रुवारी रोजी सकाळी पैठण तालुक्यातील कारकिन ढोरकिन येथे लग्नासाठी गेले होते शेख वजीर यांच्या घरी नातेवाईकांचे लग्न असल्याने बँकेतून उसाचे पैसे काढून आणले होते याची संधी साधून टोंगवस्तीवर सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूने कडीकोंडा तोडुन घरातील कपाटात ठेवलेले रोख ७२००० रुपये व १६ भाराची चांदीसह एक तोळा सोने असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला बारा वाजता शेख वजीर यांचे घराचे दार उघडे असल्याचे शेजारी राहत असलेले शोएब शेख यांच्या यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेख वजीर यांना तात्काळ फोन केला असता शेख वजीर लग्नाला गेलेले परत आले या घटनेची माहिती शेख वजीर यांनी गंगापूर पोलिसांना दिली असता गंगापूर पोलीस पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे संदीप डमाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुण पंचनामा केला परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.Conclusion:याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर हे करत आहे घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट डॉग स्कूल यांनी पाहणी केली यामध्ये आय कार युनिट चे सपोनी आर जी मुंजे ,पोहेकॉ बी यु मंचरे
, महीला पोहेकॉ इंगळे आदींनी भेट दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.