ETV Bharat / state

चुलत भाऊ-मेव्हण्यानेच चिरला भावंडांचा गळा, सातारा परिसरातील बहीण-भावाच्या हत्येचे आरोपी जेरबंद

author img

By

Published : Jun 11, 2020, 3:24 PM IST

Updated : Jun 11, 2020, 8:16 PM IST

सातारा परिसरात राहणाऱ्या किरण आणि सौरभ खंदाडे या बहीण भावाची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. या घटनेचा तपास करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी चार पथक तयार करून आरोपींचा शोध लावला. हत्येप्रकरणी सतीश खंदाडे आणि अर्जुन राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून काही प्रमाणात सोनेही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

brother sister murder in aurangabad accused arrested by police
आरोपींना अटक करण्यात आली.

औरंगाबाद - सातारा परिसरात झालेल्या बहीण-भावाच्या हत्येचा तपास पूर्ण करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठीच चुलत भाऊ आणि मेव्हण्याने दोघांची हत्या करून सोन चोरले, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त

सातारा परिसरात राहणाऱ्या किरण आणि सौरभ खंदाडे या बहीण भावाची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. या घटनेचा तपास करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी चार पथक तयार करून आरोपींचा शोध लावला. हत्येप्रकरणी सतीश खंदाडे आणि अर्जुन राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून काही प्रमाणात सोनेही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

आरोपी सतीश खंदाडे हा मृत किरण आणि सौरभ यांचा चुलत भाऊ लागतो. तर दुसरा आरोपी अर्जुन राजपूत हा आरोपी सतिषचा सख्खा मेव्हणा आहे. हे दोघेही आरोपी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांना सोमवारी खंदाडे किरण आणि सौरभ यांना औरंगाबादच्या घरी ठेऊन बाकी कुटुंबीय जालन्याला आल्याची माहिती मिळाली. दोघांनी सकाळी जालना येथून तीन चाकू विकत घेतले. आणि दुपारच्या सुमारास औरंगाबादला सातारा परिसरातील घर गाठले. यानंतर आरोपींनी किरण आणि सौरभ यांच्यासोबत गप्पा मारत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला.

यानंतर चहा पिल्यावर किरण वरच्या मजल्यावर अंघोळीसाठी गेली. त्याच वेळी आरोपींनी सौरभला बाथरूम मध्ये नेत त्याचा गळा चिरला. सौरभचा आवाज ऐकून किरण खाली पळत आली. त्यावेळी आरोपींनी किरणचे तोंड दाबून तिचादेखील गळा चिरत तिचीही हत्या केली. हत्येनंतर वरच्या घरात असलेले सोने घेऊन आरोपींनी पळ काढला.

हेही वाचा - गोंदिया : तलाठी-तहसीलदारांच्या वाहनावर वाळू तस्करांची दगडफेक

या घटनेने शहर हादरले असताना पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. सातारा पोलिसांसह पोलीस उपायुक्त राहुल खाडे, गुन्हे शाखेचे विशेष पथक सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांची पथक तपास करत होते. यावेळी तपासात ही हत्या नातेवाईंकानीच केल्याचे समोर आले.

आरोपी सतिष खंदाडे आणि अर्जुन राजपूत वैजापूरच्या दिशेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना जेरबंद केले. तर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर या हत्येचे कारण काय आहे? याचा तपास सुरू आहे. आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

सोन्याचे स्टेटस ठेवणे पडले महाग -

दीपावलीच्या काळात किरण आणि सौरभची आई अनिता लालचंद खंदाडे यांनी घरातील दीड किलो सोन्याचा फोटो आपल्या स्टेटसवर ठेवला होता. त्यानुसार आरोपींना आपले काका लालचंद खंदाडे यांच्याकडे सोने असल्याची माहिती मिळाली. त्यावेळ पासून आरोपींच्या हे सोने चोरण्याची इच्छा झाली. दरम्यान, लालचंद खंदाडे आपल्या पत्नी आणि मुलीसह जालन्याला येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याच वेळी त्यांनी औरंगाबादला येण्याच नियोजन केले होते.

Last Updated : Jun 11, 2020, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.