ETV Bharat / state

Suspend Shivsena MLA : मुख्यमंत्री साहेब, शिवसेनेच्या 'त्या' आमदाराला निलंबित करा.. भाजपच्या नेत्या आक्रमक - BJP Demands To Suspend Shivsena MLA

भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराने मारहाण ( Shivsena MLA beats Woman ) केल्याचा आरोप एका महिलेने वैजापूरच्या आमदारांवर केला होता. याप्रकरणी आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मुख्यमंत्र्यांकडेच आमदाराला निलंबित करण्याची मागणी केली ( BJP Demands To Suspend Shivsena MLA ) आहे.

मुख्यमंत्री साहेब, शिवसेनेच्या 'त्या' आमदाराला निलंबित करा.. भाजपच्या नेत्या आक्रमक

author img

By

Published : Feb 19, 2022, 9:10 PM IST

वैजापूर (औरंगाबाद ): कालच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. शिवसेना आमदारांनी महिलेला मारहाण ( Shivsena MLA beats Woman ) केल्याचा गुन्हा देखील काल वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी वैजापूरच्या शिवसेनेच्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली ( BJP Demands To Suspend Shivsena MLA ) आहे.

मुख्यमंत्री साहेब, शिवसेनेच्या 'त्या' आमदाराला निलंबित करा.. भाजपच्या नेत्या आक्रमक
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

आज भाजप महिला नेत्या वैजापूरमध्ये आक्रमक होतांना पाहायला मिळाल्या. हे प्रकरण गंभीर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदाराला निलंबित केलं पाहिजे, अशा कडव्या भाषेत महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात अजून काही कलम वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण..?

पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, काल आमच्या गावात भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. दरम्यान आज आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला आलो असता,आमदार रमेश बोरणारे यांनी मला भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच रस्त्यावर खाली पाडून लाथानी मला मारले असल्याचे महिलेने म्हटले आहे. तसेच यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीलासुद्धा मारहाण केली असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.