ETV Bharat / state

Sujay Vikhe on Shivsena : 'उद्धव ठाकरे, सावध व्हा! राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार' - खासदार सुजय विखे

आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवण्यासाठी किती अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. कारण राष्ट्रवादीचा अजेंडाच शिवसेनेला संपवण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही,अशा शब्दांत भाजपचे खा. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी शिवेसनेला राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

खासदार सुजय विखे
खासदार सुजय विखे
author img

By

Published : Apr 26, 2022, 8:50 AM IST

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवण्यामध्ये किती अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्रांना कळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ यावर निर्णय घेतला नाही तर पुढील दोन वर्षांत शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही. खरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा हाच आहे. जेवढ्या लवकर शिवसेना हे सारे ओळखेल तेवढ्या लवकर हा पक्ष सावरेल. अन्यथा काही खरं नाही, अशा शब्दांत भाजपचे खा. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी शिवेसनेला राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचे आवाहन केले आहे

राष्ट्रवादी सेनेला संपवणार - राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एका पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आपल्या पक्षाच्या नेत्याचे संरक्षण करीत आहेत. आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संकल्प सभा घेत आहेत, असे चित्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवण्यासाठी किती अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. कारण राष्ट्रवादीचा अजेंडाच शिवसेनेला संपवण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही. जेवढ्या लवकर शिवसेनेला हे समजेल तेवढ्या लवकर हा पक्ष सावरेल. बाकी त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे काय करायचे ते पाहावे. यापेक्षा मी काय जास्त बोलू शकतो? दरम्यान, खा. सुजय विखे यांनी या भाष्यातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतानाच शिवसेनेला या पक्षापासून सावध राहण्याचा इशारा दिल्याचे मानण्यात येते.

नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष - खा. विखे पाटील म्हणाले, सध्या राज्यात ज्या विषयांवरून राडा सुरु आहे, अतिशय बोगसपणा आज टीव्हीवर पाहायला मिळतोय. आहे. मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे सुरु आहे. विजेच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. आज ग्रामीण भागात कुठेही वीज टिकत नाही. भारनियमन सुरु आहे. शेतीला पुरेशी वीज मिळत नाही. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. इतरही अनेक प्रश्न आहेत. पण हे फार मोठी शोकांतिका आहे की या सगळ्यावर कुणीही बोलायला तयार नाही. माझी सगळ्याच पक्षांना विनंती आहे की सर्वांनी निर्बंध पाळून लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. कारण राज्यात सध्या जे काही सुरु आहे त्याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेणे नाही. राणा हनुमान चालीसा वाचताहेत किंवा अन्य कुणी काही करीत आहे, याच्याशी शेतकऱ्यांना काहीही करायचे नाही. शेतकऱ्याला त्याची वीज मिळायला पाहिजे, असे विखे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.