औरंगाबाद: काही चूक नसताना आमचे आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. तुम्हाला तर एक आठवड्यासाठीच निलंबित केलं. (BJP MLA Haribhau Bagde Criticism) त्यात इतकं का लागलं? असा संतप्त प्रश्न भाजप आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (BJP MLA Haribhau Bagde) यांनी उपस्थित केला. तर विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी राज्याचे काम थांबणार नाही असा टोला त्यांनी लगावला.
बाहेर येऊन जल्लोष करण्याचे काय काम: भाजपचे 12 आमदार नियमात नसताना एक वर्षासाठी निलंबित केले होते. मात्र जयंत पाटील यांनी अध्यक्षांना जी भाषा वापरली त्या बाबत त्यांना एक आठवड्यांसाठी निलंबित केले. त्याबाबत त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली असती तर ते झालं असतं. मात्र तसे न करता त्यांनी बाहेर येऊन जल्लोष केला. याला काय समजावं अशी टीका हरिभाऊ बागडे यांनी केली. अधिवेशन सुरू असताना कामकाज करू दिलं जात नसल तरी राज्याची काम थांबणार नाही, अशी टीका देखील आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.
आतापेक्षा जून बर: फुलंब्रीचे भाजप आमदार हरिभाऊ बागडे हे 2014 च्या मंत्रिमंडळात विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्त होते. आता कामकाज करताना पाहिलेला गोंधळ त्यामुळे राजकारण बदलले का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, आता नवीन नवीन लोक हे विधानसभेत येत असतात. त्यामुळे कामाची पद्धत ही नेहमी बदलते. आमच्या वेळी ती वेगळी होती, आता ती वेगळी आहे आणि येणाऱ्या काळात ती अजून बदलेल. त्यामुळे जसं जसं पुढे जाऊ तसं मागचं बरं होतं असं म्हणण्याची वेळ ही येत असते अशी खोचक टीका हरिभाऊ बागडे यांनी केली.
कचनेर येथील मूर्तीचा चोर जवळचाच: कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती चोरीला गेली असल्याचं उघड झाली, इतकंच नाही तर त्या जागी हुबेहूब मूर्ती चोरट्यांनी बदलली असल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्याविषयी बोलताना चोर जवळचाच आहे, अशी शंका भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली. चोर चोरी करताना मूर्ती घेऊन पळून गेला असता, मात्र इथे चोरी लपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे हा चोर असून मंदिरच्या जवळच कोणीतरी असावं अशी शंका हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.