औरंगाबाद - स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पक्षासोबत गेलेल्या शिवसेनेने त्यांना पक्षाच्या झेंड्याचे शुद्धीकरण केल पाहिजे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ज्यांची मनोधारणा इंग्रजांच्या कामासारखी आहे, ज्यांची कामाची पद्धत दंडुकेशाहीची आहे, त्यामुळे तुमच्या झेंड्याच शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अस वक्तव्य केले मात्र हे अर्धसत्य आहे. काँग्रेसला महाविकास आघाडी सरकार मध्ये इज्जत नाही हे पूर्ण सत्य आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला, काँग्रेसच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायपीट करावी लागते, निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने झिडकारले होते. त्यानंतर ते सत्तेत आले असले तरी महाविकास आघाडीने पण त्यांना झिडकारले असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.
वीजबिलाविषयी सरकारची पाठ सोडणार नाही
वीज बिलाबाबत आम्ही इशारा दिला होता, आमच्या मुद्द्यावर मनसे आंदोलन करत आहे. बिलात सवलत देऊ म्हणत महाविकास आघाडीने लबाडी केली, यांना जनता कधी माफ करणार नाही, आधी काही युनिट मोफत देऊ नंतर काही सवलत देऊ म्हणणाऱ्या नेत्यांना पक्षातील नेत्यांनी किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांना वीजबिल भराव लागेल हे विधान करावं लागतं, आम्ही चेतावणी देऊ, झोपडीत राहणाऱ्याला जास्त बिल कस येत याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी आणि विजमंत्र्यांना द्यावं लागेल, विजबिलात सवलत मिळे पर्यंत आम्ही पाठ सोडणार नाही. असा इशारा आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिला...
देवेंद्र फडणवीस यांनी भरगोस मदत देऊनही औरंगाबादचा विकास का नाही?
औरंगाबाद शहराचा विकास करण्यासाठी युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी भरीव मदत केली. औरंगाबादेत 1680 कोटींचा पाणी योजना मंजूर केली मात्र सरकार बदललं त्यामुळे अंमलबजावणी थांबली, रस्त्यासाठी 125 कोटी दिले त्यातही अद्याप अनेक काम प्रलंबित आहेत. घनकचरा 80 कोटी मदत दिली, मराठवाड्याचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी वॉटर ग्रीड साठी गती देण्याच काम केलं, मात्र मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करण्याच काम महाविकास आघाडी सरकारने केलं. समृद्धी महामार्गाला सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला. प्रत्येक घरात पिण्याला पाणी का देत नाहीत याच उत्तर सरकारने द्यावे अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप विजयी होणार
शिक्षकांच्या बाबतीत न्याय देण्यास सतीश चव्हाण कमी पडले त्यामुळे यावेळी भाजप विजयी होणार असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत त्यांना जनतेला उत्तर द्यावे लागेल. लॉक डाऊन नंतर तीन शिक्षकांचा मृत्यू झाला तर 15 जणांनी आत्महत्या केली. सरकारने काय केले? शिक्षक अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, मात्र एक वर्षात अनुदान मिळालं नाही. शिक्षकांनी काळी दिवाळी केली, याला महाविकास आघाडी जबाबदार आहे, आमदार सतीश चव्हाण जबाबदार आहेत, अनुदान मिळवण्यासाठी सतीश चव्हाण यांनी काहीही केलं नाही. त्यामुळे त्यांचा हिशोब चुकता करण्याची निवडणूक आहे. अशी टीका शेलार यांनी केली. विधानसभेत गोंधळ घळण्याशिवाय कोणतं कर्तृत्व त्यांनी केलं अस दिसत नाही, संस्था चालकांची पिळवणूक केली. असा आरोप देखील शेलार यांनी केला.
जयसिंगराव गायकवाड यांनी शब्द जपून वापरावे
भाजप जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यावेळी पक्षाची उंची जास्त वाढल्याची टीका त्यांनी केली होती त्यावर ज्या पक्षाने त्यांना इतक्या उंचीवर नेलं त्यांनी पक्षाच्या उंचीबाबत बोलू नये, अशी टीका , पक्षाने जे देता आलं ते दिल. आज पर्यंत त्यांचा सन्मान पक्षाने केला. मात्र यापुढे अपशब्द वापरला तर आम्ही शांत बसणार नाही. अशी टीका आशिष शेलार यांनी केली.