ETV Bharat / state

औरंगाबादमधील ऑक्सिजन प्लांटचे काम संथगतीने, भाजपाकडून आंदोलनाचा इशारा - औरंगाबाद जिल्हा लेटेस्ट न्यूज

जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे, मात्र अद्यापही त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठीच हा प्लांट सुरू करण्यात आला नाही, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

औरंगाबादमधील ऑक्सिजन प्लांटचे काम संथगतीने

author img

By

Published : May 11, 2021, 6:05 PM IST

औरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे, मात्र अद्यापही त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठीच हा प्लांट सुरू करण्यात आला नाही, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच याचा निषेध करत भाजपाच्या वतीने या ऑक्सिजन प्लांटचे प्रतीकात्मक पूजन करण्यात आले.

दोन महिन्यांपासून प्लांट सुरू होण्याची प्रतीक्षा

औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आला आहे. मात्र नुसती टाकी उभी करण्यात आली असून, या टाकीला अद्याप गॅस कनेक्शन देण्यात आलेले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून ही टाकी गॅस कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहे. या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे, असा आरोप देखील यावेळी संजय केनेकर यांनी केला आहे. दरम्यान जर प्लांट सुरू होण्यासाठी दोन महिने लागणार असतील तर कोरोनामुळे नागरिक मरू द्यायचे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा भाजपाचा आरोप

दीड महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने चार रुग्ण दगावल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी केला आहे. ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही, तसेच गॅस सिलिंडर लावण्यास विलंब झाला, त्यामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केनेकर यांनी केला आहे. दरम्यान रुग्णांच्या जीवाची हेळसांड करणाऱ्या जिल्हा प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी उपमहापौर बापू घडामोडे यांनी केली आहे.

औरंगाबादमधील ऑक्सिजन प्लांटचे काम संथगतीने

भाजपाच्या वतीने आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. त्यासाठीच जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र अद्यापही या प्लांटचे काम संथ गतीने सुरू आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठीच हा विलंब केला जात असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे. ऑक्सिजन प्लँटचे काम तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन करू असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांना जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.