ETV Bharat / state

मराठवाड्याचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले; औरंगाबादेत भाजपा आक्रमक

author img

By

Published : Aug 4, 2021, 6:37 PM IST

औरंगाबादला मंजूर केलेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याच्या निर्णयाविरोधात भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शन केली. पुण्यात पुरेशा क्रीडा सुविधा असताना औरंगाबादेत मंजूर करण्यात आलेले क्रीडा विद्यापीठ पुण्यात नेणे हा मराठवाड्यावरील अन्याय आहे. क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादते होणे ही रास्त मागणी असून ती पूर्ण करा आणि या मागणीसाठी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला.

औरंगाबादेत भाजपा आक्रमक
औरंगाबादेत भाजपा आक्रमक

औरंगाबाद - औरंगाबादला मंजूर केलेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याच्या निर्णयाविरोधात भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शन केली. पुण्यात पुरेशा क्रीडा सुविधा असताना औरंगाबादेत मंजूर करण्यात आलेले क्रीडा विद्यापीठ पुण्यात नेणे हा मराठवाड्यावरील अन्याय आहे. क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादते होणे ही रास्त मागणी असून ती पूर्ण करा आणि या मागणीसाठी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला.

मराठवाड्याचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले

युती सरकारने मंजूर केले होते विद्यापीठ

भारतीय जनता पक्ष सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागाची ही गरज लक्षात घेता क्रीडा विद्यापीठासाठी जमीन हस्तांतरण आणि मनुष्यबळ भरती संदर्भातील कामे 'फास्ट ट्रॅक' वर घेण्यात आली होती. क्रीडा विद्यापीठासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण देखील पूर्ण करण्यात आले होते. मात्र अशा परिस्थितीत मराठवाड्याबाबत फारशी आस्था नसलेल्या महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले असा आरोप भाषणे करत आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पुण्यात आहेत आधीपासून सुविधा -

पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अगोदरच मोठ्या प्रमाणवर क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. असे असताना क्रीडा विद्यापीठ परत तिथेच नेणे हा मराठवाड्यावर अन्याय आहे. विद्यापीठ औरंगाबादला स्थापन झाले तर, हजारो रोजगार निर्माण झाले असते. त्याचबरोबर मागास भागात खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. शारीरिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नताही क्रीडा विद्यापिठाकडे करता आली असती. औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठाची मागणी ही अगदी रास्त मागणी असून ते अन्यत्र हलवणे मराठवाड्यासाठी अन्यायकारक आहे.

औरंगाबादला क्रीडा विद्यापीठ मंजूर करून त्वरित त्याच्या कामाला सुरुवात करावी. अशी मागणी भाजप तर्फे विद्यमान आमदार तथा माजीमंत्री अतुल सावे, जिल्हा आंदोलनात करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. आंदोलनात यावेळी माजी उपमहापौर संजय जोशी, संगठन सरचिटणिस राजेश मेहता, अनुसूचित मोर्चोचे बबन नरवाडे, मनीषा भंसाली, महिला मोर्च शहर अध्यक्ष अमृता पालोदकर, अनुसूचित मोर्च प्रदेश उपाध्यक्ष जलिंदर शेंदगे, अल्पसंख्याक मोर्च जिल्हा अध्यक्ष हाजी दैलत खान पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.