ETV Bharat / state

Accident In Aurangabad : भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या कारची दुचाकीला धडक ; पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर

author img

By

Published : Jan 9, 2023, 1:10 PM IST

दौलताबादकडून पडेगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी व कारचा भीषण अपघात (Bike Car accident In Aurangabad) झाला. भरधाव वेगाने ओव्हरटेक करत कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवर पत्नी आणि लहान मुलगा प्रवास करत होते. पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी (Bike Car accident husband died) झाले. पतीचा रूग्णालयात नेईपर्यंत मृत्यु (wife and son in critical condition) झाला.

Accident In Aurangabad
औरंगाबादमध्ये अपघात

औंरंगाबाद : दुचाकीचालकाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने धडक (Bike Car accident In Aurangabad) दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील पती, पत्नी आणि लहान मुलगा दूरवर फेकले गेले. डोके व छातीला गंभीर दुखापत झाल्याने पतीचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू (Bike Car accident husband died) झाला. पत्नी व चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णू त्र्यंबक वाघ असे मृताचे नाव (wife and son in critical condition) आहे.

दुचाकीचा झाला चुराडा : कन्नड तालुक्यातील मकरंदपूर येथील विष्णू हे पत्नी व आठ महिन्यांच्या चिमुकल्यासह दुचाकीने दौलताबादकडून पडेगावच्या दिशेने येत होते. त्याचदरम्यान वेगाने येणाऱ्या फोर्ड कंपनीच्या कारने फौजी ढाब्यासमोर विष्णू यांच्या दुचाकीला धडक दिली. स्थानिकांनी धाव घेत तिघांना रुग्णालयात भरती केले. मात्र डोके व छातीला गंभीर दुखापत झालेल्या विष्णू यांचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला. तर पत्नी व चिमुकल्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी (Bike Car accident) सांगितले.

रस्त्यावर अपघात वाढले : घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंब गावाकडून शहरात येण्यासाठी रवाना झाले होते. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, कारचा वेग इतका होता की, विष्णू यांच्या दुचाकीचे हँडल कारच्या चाकाखाली येऊन चुराडा झाला, तर चाकदेखील वेगळे झाले. चिमुकल्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू आहेत. ऐतिहासिक वेरूळकडे जाणाऱ्या मार्गावर सुसाट वाहनांना ओव्हरटेक करण्याचे प्रकार पडेगाव - दौलताबाद दरम्यान अधिक झाले आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तीन दिवसांपूर्वी शहरातील कलकत्ता पानाच्या व्यापाऱ्याचे निधन झाले होते. तर छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. त्यामुळे अपघात थांबवायचे कसे असा प्रश्न पडला (Accident In Aurangabad) आहे.

ऑगस्टमधील घटना : औरंगाबादमधील साकेगाव - मनुर रस्त्यावर भीषण अपघात घडला होता. शेतात मोलमजूरी करुन उपजिविका भागवणा-या दोन शेतमजूर महिलांना भरधाव वेगाने टेम्पोने चिरडले होते. यात त्या दोघी जागीच ठार झाल्या होत्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृत दोघीही नात्याने चुलती पुतणी होत्या. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (५६), मंगल आसाराम दवंगे (३८) अशी या दोघींची नावे होते. रस्ते अपघातात सांयकाळी घराकडे परतताना काळाने त्यांच्यावर मुत्यूची झडप घातली होती. टेम्पो क्र. एमएच २१ डी ९११६ ने जोराची त्यांना धडक दिली होती. या अपघातानंतर चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.