ETV Bharat / state

बीबीका मकबरा येथे लाईट शो, प्रायोजक मिळताच सुरू होणार काम

जागतिक वारसा असणाऱ्या ऐतिहासिक पर्यटन स्थळ पाहण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित केलेली असते. त्यात बहुतांश पर्यटनस्थळ सायंकाळी 6 नंतर बंद करण्यात येतात. बिबीका मकबरा मात्र रात्री १० पर्यंत सुरू असतो. बीबीच्या मकबऱ्याची वास्तू शहराच्या मध्यवस्तीत आहे. सुरेख अशी इमारत असून त्यात लाईट इफेक्ट्स दिले तर मनमोहक अशी वास्तू दिसून येईल.

बिबीका मकबरा
बिबीका मकबरा
author img

By

Published : Jul 11, 2021, 10:26 AM IST

Updated : Jul 11, 2021, 1:10 PM IST

औरंगाबाद - ऐतिहासिक वास्तू असलेल्या बीबीका मकबरा येथे लवकरच लाईट शो करण्याच्या हालचाली पुरातत्व विभागाने सुरू केल्या आहेत. मकबऱ्याच्या मनमोहक अश्या वास्तूत रात्री लाईट इफेक्ट्स देऊन पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आयोजकांनी पुढे यावे, अशी माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद अधीक्षक डॉ.मिलन कुमार चावले यांनी दिली.

मकबरा येथे लाईट शो,
मकबरा रात्री 10 पर्यंत राहणार सुरूजागतिक वारसा असणाऱ्या ऐतिहासिक पर्यटन स्थळ पाहण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित केलेली असते. त्यात बहुतांश पर्यटनस्थळ सायंकाळी 6 नंतर बंद करण्यात येतात. बिबीका मकबरा मात्र रात्री १० पर्यंत सुरू असतो. बीबीच्या मकबऱ्याची वास्तू शहराच्या मध्यवस्तीत आहे. सुरेख अशी इमारत असून त्यात लाईट इफेक्ट्स दिले तर मनमोहक अशी वास्तू दिसून येईल. त्यामुळे बीबी का मकबरा रात्री 10 पर्यंत सुरू ठेऊन पर्यटकांना आकर्षित केले जाणार असल्याची माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद अधीक्षक डॉ.मिलन कुमार चावले यांनी दिली. मकबरा येथे पर्यटकांसाठी उभारणार सुविधाबीबी का मकबरा हे पर्यटन स्थळ पर्यटकांना रात्री आकर्षित करणारे आहे. रात्रीच्या अंधारात मकबऱ्याचे रूप काही वेगळेच अनुभवायला मिळते. मात्र, अपुऱ्या सुविधा असल्याने पर्यटक मकबऱ्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे पर्यटन स्थळांवर सुविधा उभारणाच्या तयारी केली जात आहे. त्यात मकबऱ्याच्या जवळील उद्यान सुरू करणे, मोकळ्या जागेत वॉकिंग ट्रॅक तयार करणे यांचा समावेस आहे. अशी माहिती पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद अधीक्षक डॉ.मिलन कुमार चावले यांनी दिला.

हेही वाचा - Copa America 2021 Final : ब्राझीलला १-० ने हरवत अर्जेंटिनाचा विजय; मेस्सीने पहिल्यांदाच जिंकली मेजर टूर्नामेंट

Last Updated : Jul 11, 2021, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.