औरंगाबाद - येथील भुसावळ-पुणे बसच्या वाहकाने दारू पिऊन बसमध्ये धिंगाणा घातल्याने प्रवाशांनी याची तक्रार जामनेर (जिल्हा जळगाव) डेपोला केली. त्यानंतर बस दुपारी 12:30 वाजता अजिंठा बसस्थानकावर थांबविण्यात आली. त्या वाहकाला अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालत दाखल करण्यात आले. सुदाम उत्तम दामोडे (वय 40 रा. वाकोद) असे वाहकाचे नाव आहे.
हेही वाचा- वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच
भुसावळ-पुणे बस (एम. एच. 20 बी. एल. 3437) सकाळी 9:40 वाजता पुणेसाठी निघाली होती. दरम्यान, बस वाहकाने अजिंठा लेणी लगत असलेल्या फर्दापूर जवळ एका धाब्यावर दारू पिली. प्रवाशांशी त्याने वाद घातला. या बसमध्ये 42 प्रवासी होते. नशेत असलेल्या वाहकाच्या अंगावर पाणी टाकण्यात आले. तरी त्याची नशा उतरली नाही. म्हणून त्याला अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.