ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ही 'अजब' नोटीस पाहिलीत का?

author img

By

Published : Nov 9, 2019, 9:18 PM IST

Updated : Nov 9, 2019, 11:45 PM IST

या विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहाच्या गेटवर एक नोटीस लावण्यात आली. 'मुलींनी कोणत्याही मुलाशी बोलू नये, नोट्स घ्यायच्या असतील तर त्या वॉचमेनच्या माध्यमातून घ्यावात. या नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच घरच्यांनाही याबाबत सांगण्यात येईल ', अशा स्वरुपाची नोटीस गेटवर लावण्यात आली होती.

विद्यापीठातील ही 'अजब' नोटिस पाहिलीत का?

औरंगाबाद - प्रत्येक माणसाला आयुष्यात शिस्तीचे धडे हे कुटुंब, शाळा, कॉलेज आणि समाज यांच्याकडून मिळत असतात. विद्यार्थ्याची जडणघडण ही शाळेपासून सुरू होते. चांगली शिस्त, कडक नियम यांचे पालन करण्यासाठी त्याला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी सांगितले जाते. मात्र, अविचारी शिस्तीचे नियम विद्यार्थ्यांवर थोपवण्यात आले तर?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोटीस

हेही वाचा - बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर 'या' तीन खेळाडूंची संघातून होऊ शकते गच्छंती

असाच काहीसा प्रकार औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला आहे. येथील अनेक नियमांना घेऊन आधीच विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात होता. आता त्यात अजून एका नियमाची भर पडली आहे. या विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहाच्या गेटवर एक नोटीस लावण्यात आली. 'मुलींनी कोणत्याही मुलाशी बोलू नये, नोट्स घ्यायच्या असतील तर त्या वॉचमेनच्या माध्यमातून घ्यावात. या नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच घरच्यांनाही याबाबत सांगण्यात येईल ', अशा स्वरुपाची नोटीस गेटवर लावण्यात आली होती.

bamu student agitation for girls hostel notice
मुलींच्या वसतीगृहाच्या गेटवरील नोटीस

मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याने त्याचा निषेध म्हणून सर्व मुलींनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत निदर्शन केली. तसेच लावण्यात आलेल्या नोटीसचा मुलींनी निषेध करत ही नोटीसही फाडून टाकली. विशेष म्हणजे या नोटीसवर कोणत्याही अधिकृत व्यक्ती अथवा अधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे नेमकी ही नोटीस कोणी लावली?, आणि त्याचा हेतू काय होता? हे अजुनपर्यंत समोर आलेले नाही.

Intro:

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यर्थिनींचा वस्तीगृहाताबाहेर लावलेल्या नोटिस च्या विरोधात विध्यर्थ्यांनी गर्स होस्टेल समोर निदर्शन केली.

Body: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मध्ये नियमांना घेउन विध्यार्थ्याँकडून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच शुक्रवारी अजुन एका नियमाची भर पडली. विद्यापीठातील मुलींच्या होस्टेलच्या गेट वर एक नोटिस लावण्यात आली. यात मुलींनी कोणत्याही मुलाशी बोलू नये, नोट्स घ्यायच्या असतील तर त्या वाचमैन च्या माध्यमातून घ्यावा अशा स्वरुपाची नोटिस गेट वर लावण्यात आलेली होती. याच पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच घरच्यांना याबाबत सांगण्यात येईल अशा प्रकारची नोटिस गेट वर लावण्यात आलेली होती. मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याने त्याचा निषेध म्हणून सर्व मुलींनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत निदर्शन केली. तसेच या लावण्यात आलेल्या नोटिसचा मुलींनी निषेद करत संबंधीत नोटिस गेट वरुन फाडून टाकली. विशेष म्हणजे या नोटिस वर कोणत्या ही अधिकृत व्यक्ती अथवा अधिकारीची मान्यता नसलेली ही नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली. नेमकी ही नोटीस कोणी लावली, आणि त्याचा हेतू काय होता हे अजुन पर्यंत समोर आलं नसल तरी यामुळ मुलींमध्ये नाराजगी पहायला मिळाली. यावेळीमेघना मराठे, श्रद्धा खरात, दिक्षा पवार, रेखा काकडे, ऐश्वर्या पवार, मनिषा बल्लाळ, लोकेश कांबळे, अमोल खरात, रामप्रसाद वाव्हळ, सत्यजित म्हस्के, दिपक बहिर, प्रविण चिंतोरे यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची उपस्थिती होती.Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 11:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.