ETV Bharat / state

ओल्या दुष्काळाचा बळी, सिल्लोडच्या शेतकऱ्याची पुण्यात आत्महत्या

कर्ज आणि चांगले पीक पाण्यात गेल्याच्या विवंचनेतून धानोरा येथील शेतकऱ्याने पुण्यात आत्महत्या केली आहे.

पुर्णाजी काकडे
author img

By

Published : Oct 30, 2019, 10:32 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा एक बळी गेला आहे. पावसामुळे मक्याची शेती पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे तरूण शेतकऱ्याने पुण्यात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

पुर्णाजी रामदास काकडे (वय 35 वर्ष रा. धानोरा, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी रात्री आत्महत्या केली. बुधवारी धानोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. काकडे यांचेवर सहकारी सोसायटीचे १२ हजार रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय खासगी कर्ज व इतर देणी होती. महसूल विभागाने पंचनामा करून शासनाला अहवाल दिला आहे. कर्जामुळे तो पुणे येथे कंपनीमध्ये ते काम करत होता. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले मका पीक उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाल्यावर त्याने पुण्यातील भाड्याच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी व आई-वडील असा परिवार आहे.

Intro:सिल्लोड : तालुक्यात ओल्या दुष्काळाचा एक बळी गेला असून शेती पाण्याखाली डुबल्याने त्यात मका पिकांचे झालेले नुकसान बघून कामासाठी बाहेर गावी गेलेल्या तरुण शेतकऱ्यांने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
Body:आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्या चे नाव पुर्णाजी रामदास काकडे वय 35 वर्ष रा. धानोरा असे आहे. त्यांनी मंगळवारी रात्री आत्महत्या केली.बुधवारी धानोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. काकडे यांचेवर सहकारी सोसायटीचे १२००० रु कर्ज आहे
याशिवाय खाजगी कर्ज व इतर देणी होती.महसूल विभागाने पंचनामा करून शासनाला अहवाल दिला आहे.
Conclusion: पुणे येथे कंपनीमध्ये ते काम करत होते. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले मका पीक उद्धवस्त झाले याची माहिती मिळाल्यावर त्यांनी भाड्याने राहत असलेल्या पुणे येथील खोलीत गळफास घेवून आत्महत्या करुन घेतली .त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी व आई वडील असा परिवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.