ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने वाढले 94 कोरोनाबाधित, रुग्णांची संख्या अडीच हजारांवर

author img

By

Published : Jun 12, 2020, 12:23 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 94 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2524 झाली आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 94 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2524 झाली आहे. यापैकी 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 128 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कटकट गेट (1), समर्थ नगर (2), रोशन गेट (1), संजय नगर (1), संभाजी कॉलनी (1),सिल्क मील कॉलनी (1), सिडको (1), राम नगर (1), पीर बाजार (2), उस्मानपुरा (1), कबीर नगर, सातारा परिसर (2), रोशनगेट (4), औरंगपुरा (5), सादात नगर (2), बायजीपुरा (3), पुंडलिक नगर (6), सिटी चौक (1), जुना बाजार, न्यू वस्ती (2), चेतना नगर (1), शिवाजी नगर (3), बौद्ध नगर, जवाहार कॉलनी (2), सारंग सोसायटी (2), उत्तम नगर (1), महेश नगर (2), गौतम नगर, जालना रोड (1), न्यू हनुमान नगर (1), जुना मोंढा, गवळीपुरा (1), एन आठ सिडको (1), छावणी परिसर (1), सुंदरवाडी (1), गुलमंडी (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), ‍विशाल नगर (3), पटेल नगर (2), रेणुका माता मंदिर एन नऊ (1), यशोधरा कॉलनी, नेहरु नगर (1), रहीम नगर (1), भवानी नगर (1), साई नगर, एन सहा,सिडको (1), खोकडपुरा (1), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), एन तीन सिडको (1), सिडको टॉउन सेंटर, एन वन (1), संत एकनाथ सोसायटी (2), एन चार सिडको (1), बारी कॉलनी (1), रोजा बाग (1), एमजीएम परिसर (1), बजाज नगर (2) आणि निल्लोड ता. सिल्लोड (3), वैजापूर (1), मारीसूरी कॉलनी, गंगापूर (1), गणेश नगर, पंढरपूर (1), पडेगाव (1), कन्नड (2), मुकुंदवाडी (1), खुलताबाद (1), नारेगाव (2), कानडगाव (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 46 महिला आणि 48 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या 128वर पोहचली असून ही औरंगाबादकरांसाठी चिंतेची बाब आहे, असे मानले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.