ETV Bharat / state

आईच्या हत्येमुळे मुले झाली अनाथ; वर्दीतल्या माणसांमुळे मिळाला आधार - औरंगाबाद पोलीसांचा अनाथांना आधार

चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या महिलेला 2 मुली आणि 2 मुले आहेत. मुलींचे वय 13 आणि 11 तर मुलांचे वय 9 आणि 4 आहे. आईचा मृत्यू झाल्याने त्यांचा आधारच हरवला होता. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली मुले कुठे जातील? या मुलांचे काय करावे, असा प्रश्न पडला होता.

Aurangabad Police helps to orphan for live in aurangabad
वर्दीतल्या माणसांमुळे चार अनाथांना मिळाला आधार
author img

By

Published : Dec 8, 2019, 8:50 AM IST

औरंगाबाद - पोलिसांबद्दल समाजात चांगली प्रतिमा नाही असे काही प्रमाणात दिसते. मात्र, येथे पोलिसांचे वेगळे रुप पाहायला मिळाले आहे. हत्या झालेल्या महिलेच्या मुलांना आधार देऊन पोलिसांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केला आहे.

वर्दीतल्या माणसांमुळे चार अनाथांना मिळाला आधार

चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या महिलेला 2 मुली आणि 2 मुले आहेत. मुलींचे वय 13 आणि 11 तर मुलांचे वय 9 आणि 4 आहे. आईचा मृत्यू झाल्याने त्यांचा आधारच हरवला होता. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली मुले कुठे जातील? या मुलांचे काय करावे, असा प्रश्न पडला होता. यानंतर पोनि महेश आंधळे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा केली.

चर्चेनंतर सातारा परिसरातील भगवान बाबा पालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्यांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. यानंतर यातील 2 मुली आणि एका मुलाला सातारा परिसरातील भगवान बाबा पालिका आश्रमात दाखल करण्यात आले आहे. तर सर्वात लहान मुलाला भारतीय समाज सेवा केंद्रात भरती करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि महेश आंधळे यांनी या मुलांची जबाबदारी स्विकारल्याने पोलीस विभागाचे कौतुक केले जाते आहे.

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

दोन्ही बहिणी प्रचंड हुशार -

आश्रमात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही मुली आणि एक मुलगा चांगलेच चर्चेत आल्या आहेत. या दोन्ही बहिणी प्रचंड हुशार आहेत. कुठलं प्रशिक्षण न घेता एक खेळात तर दुसरी नृत्यात पारंगत आहे. एवढेच नाही तर मोठी मुलगी खेळात आणि लहान मुलगी नृत्यात चांगली कामगिरी करू शकतात असा विश्वास बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

अशी झाली होती हत्या -

पाच महिन्यांपूर्वी यांची आई रोजप्रमाणे कामाला गेली. रात्र झाली तरी आई न आल्याने मोठ्या बहिणीने लहान भावंडांना घेत शोध घेतला. मात्र, त्या कुठेही मिळाल्या नाहीत. यानंतर 2 दिवसांनी अचानक पोलीस आले आणि एका नराधमांने त्यांच्या आईची क्रूर हत्या केल्याची माहिती दिली. एका प्रियकराने प्रेयसीसोबत पळून जायचे असताना प्रेयसीला मृत भासवायचे होते. म्हणून यासाठी त्याने या महिलेची हत्या केली आणि प्रेयसीचे कपडे घालत प्रेत अर्धवट जाळून टाकले होते. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला आणि आरोपीला गजाआड केले.

अनं पोलीस-मुलामध्ये तयार झाले अनोखे नाते -

मृत महिलेच्या कुटुंबाला पोलिसांनी आधार दिल्याने मुलांमध्ये आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वेगळेच नाते निर्माण झाले आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वेळ मिळाल्यावर मुलांना न विसरता भेटायला जातात. 4 महिन्यांपूर्वी बालिकाश्रमात दाखल केलेले हे चिमुकले दुःखातून हळूहळू बाहेर पडत आहेत.

Intro:पोलीस म्हणलं की त्यांची समाजात खराब प्रतिमा सर्वांना आठवते. मात्र औरंगाबाद मध्ये पोलिसांचं वेगळं रूप पाहायला मिळालं. महिलेची हत्या झाल्यावर तिच्या अनाथ मुलांना पोलिसांनी आधार दिलाय. इतकंच नाही तर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी पोलिसांनी घेतल्याने सर्वत्र पोलिसांचं कौतुक केलं जातं आहे.

Body:औरंगाबादच्या चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात मृत महिलेला दोन मुली आणि दोन मुलं असल्याचं दिसून आलं. त्यांना कोणाचा आधार नसल्याने चारही मुलांना आधार हरवला होता. त्यांची अवस्था पाहून तापसी अधिकाऱ्यांना वेदना झाल्या. या मुलांचं काय असा प्रश्न पोलीस कर्मचार्यांना पडला. पोलीस सहाय्क पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा करून या मुलांना सातारा परिसरातील भगवान बाबा पालिका आश्रमात भरती केलं. आणि मुलांना आधार मिळाला. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि महेश आंधळे यांनी या मुलांची जबाबदारी स्वीकारल्याने पोलीस विभागाचे कौतुक केलं जातं आहे.

Conclusion:औरंगाबादच्या भगवान बाबा बालिका आश्रमात दोन मुली आणि एक मुलगा चांगलाच चर्चेत आल्या आहेत. कारण ही तसंच आहे. इथे राहणाऱ्या दोनही बहिणी प्रचंड हुशार आहेत. एक खेळात पारंगत आहे तर दुसरी नृत्यात ते ही कुठलं प्रशिक्षण न घेता. या बहिणीचं कौतुक होत असल तरी या बहिणीची कहाणी अतिशय दयनीय आहे. आश्रमात राहणाऱ्या दोन बहिणी आपल्या एका भावसह राहतात मात्र यांचा एक भाऊ दुसऱ्या अनाथ आश्रमात राहत आहे. पाच महिन्यांपूर्वी यांची आई रोज प्रमाणे कामाला गेली. रात्र झाली तरी आई न आल्याने मोठ्या बहिणीने लहान भावंडांना घेत तपास केला मात्र कुठेही आई मिळाली नाही. मात्र दोन दिवसांनी अचानक पोलीस आले आणि आई जगात नाही हे त्यांना कळाल. जगात आई शिवाय आधार नव्हता मात्र नियतीने तो ही हिरावला. एका नराधमांन त्यांच्या आईची क्रूर हत्या केली होती. प्रयसी सोबत पळून जाताना प्रियसीला मृत भासवण्यासाठी या चिमुकळ्यांच्या आईची हत्या करून प्रेत अर्धवट जाळून टाकलं होतं. मात्र पोलिसांनी सत्य उघडकीस आणत आरोप गजाआड केले. पण त्यामागे अजून एक हृदय पिळवून टाकणार सत्य दिसलं ते या चिमुकल्या मुलांचं होत. या मुलांना भेटल्यावर जगात एकच आधार होता तो आईचा हे पोलिसांच्या निरदर्शनास आलं. 13 आणि 11 वर्षांच्या मुली आणि नऊ आणि चार वर्षांचे मुलं आईच्या प्रतीक्षेत चिंतेत बसले होते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली मुलं जातील कुठं असा प्रश्न तापसी अधिकाऱ्यांना पडला. चिखलठाणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश आंधळे यांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबत माहिती देत या मुलांना आधार देण्याची गरज असल्याचं सांगितलं. महेश आंधळे आणि त्यांच्या सहकार्यांनी सातारा परिसरातील भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रकारांची माहिती देत सर्व मूल त्यांच्या आश्रमात ठेवली. त्यातील सर्वात लहान मुलाला भारतीय समाज सेवा केंद्रात भरती करून कोणत्याही नातेवाईकांची वाट न पाहता सर्व मुलांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवलं. हत्येचा तपास झाल्यावर मयत महिलेच्या कुटुंबाला पोलिसांनी आधार दिल्याने मुलांमध्ये आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वेगळंच नात निर्माण झालं असल्याचं सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितलं. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वेळ मिळाल्यावर या मुलांना न विसरता भेटायला जातात. चार महिन्यांपूर्वी बालिकाश्रमात दाखल केलेले हे चिमुकले दुःखातून हळूहळू बाहेर पडत आहेत. इतकंच नाही तर मोठी मुलगी खेळात आणि लहान मुलगी नृत्यात चांगली कामगिरी करू शकतात असा विश्वास बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांनी व्यक्त केला आहे. या मुलांना सजातील लोकांची साथ मिळाली तर नक्कीच ही मुलं चांगलं नाव लौकिक कमवतील यात शंका नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.