ETV Bharat / state

औरंगाबादेत सायकल डे; मनपा आयुक्तांसह कर्मचाऱ्यांनी सायकल चालवत गाठली पालिका - Aurangabad Mnc bicycle Day

सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्ती नाही, मात्र याबाबत विनंती केली आहे, असे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांनी सायकल चालवत गाठली पालिका
कर्मचाऱ्यांनी सायकल चालवत गाठली पालिका
author img

By

Published : Nov 2, 2020, 4:09 PM IST

औरंगाबाद - महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी सायकल चालवत आज पालिका गाठली. महिन्याच्या पहिल्या कामाच्या दिवशी सायकल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार आजपासून महिन्यातून एक दिवस सायकल चालवणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

सायकल डे निमित्त मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आणि आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची प्रतिक्रिया

सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्ती नाही, मात्र विनंती केली आहे. इंधन बचत आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी महिन्यातून तीन-चार दिवस सायकल चालवली पाहिजे. त्यासाठी आजपासून महिन्याच्या पहिल्या कामाच्या दिवशी सायकलवर येऊन काम करण्याचा निश्चय केल्याचे आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरात जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी असे आवाहन आयुक्त पांडेय यांनी केले. याला सायकल असोसिएशनने प्रतिसाद दिला आहे. शहरात सायकल प्रेमींना एकत्र आणून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले. याआधी अकोल्यात महानगरपालिका आयुक्त असताना असाच उपक्रम राबवला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. औरंगाबाद शहारातील नागरिक देखील या उपक्रमाला प्रतिसाद देतील, असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला.

सायकलसाठी वेगळा मार्ग...

औरंगाबाद शहरात सायकलप्रेमी आहेत. अनेकजण रोज सायकल वापरतात. मात्र, शहरातील वाहनांची वर्दळ लक्षात घेता सायकल चालकांना सायकल चालवणे अवघड जाते. त्यामुळे, शहरात आता सायकल चालवण्यासाठी वेगळा मार्ग तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

सायकल चालवणे आरोग्यदायक...

मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी देखील सायकल चालवत आपले दैनंदिन काम केले. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या बैठकीला आणि त्यानंतर मनपा कार्यालयात त्या सायकलवर आल्या. सायकल चालवल्याने शरीर चांगले राहाते आणि त्यामुळे कोरोनाला देखील आपण हरवू शकतो. म्हणून मनपा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा- औरंगाबादेत मंडप असोसिएशनचे धरणे आंदोलन, व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.